आव्हाण्याच्या तीन विद्यार्थ्यांना ६० तरुणांकडुन मारहाण
By admin | Published: December 29, 2015 11:52 PM
जळगाव: आव्हाणे ता.जळगाव येथील स्वनील चौधरी, सागर पाटील, प्रदीप प्रभाकर चौधरी या तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजता ॲँग्लो उदू हायस्कुलसमोर ५० ते ६० तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर तीन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. याच वेळी मारहाण करणारा गटही तेथे दाखल झाला. दरम्यान, आमदार सुरेश भोळे, गफ्फार मलिक व करीम सालार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
जळगाव: आव्हाणे ता.जळगाव येथील स्वनील चौधरी, सागर पाटील, प्रदीप प्रभाकर चौधरी या तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजता ॲँग्लो उदू हायस्कुलसमोर ५० ते ६० तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर तीन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. याच वेळी मारहाण करणारा गटही तेथे दाखल झाला. दरम्यान, आमदार सुरेश भोळे, गफ्फार मलिक व करीम सालार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याने गुन्हा दाखल झाला नाही.शहरातील तीन विद्यार्थी दुचीकीवर तीन सीट मंगळवारी सकाळी ॲँग्लो उर्दू शाळेकडे गेले होते, त्याच वेळी आव्हाणे येथील हे तीन्ही तरुणही त्या रस्त्याने शाळेकडे गेले होते. शाळेत असलेल्या एका राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेवरुन शाळेतील काही विद्यार्थ्यांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर हे तरुण तेथून निघून गेले. हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थी व बाहेरील तरुणांना सांगितला. दुपारी तीन वाजता आव्हाणेचे हे तीन तरुण त्याच रस्त्याने स्टेडीयमकडे येत असताना यांनीच शाळेत जावून वाद घातल्याचा गैरसमज करुन ५० ते ६० तरुणांनी या तिघांना रॉड व नारळने मारहाण केली. या मारहाणीत दोघांच्या तोंडाला जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून झालेला प्रकार कथन केला. यावेळी पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, गुन्हे शोध पथकाचे राजू मेंढे, अल्ताफ पठाण यांनी शाळेकडे जावून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हे तीन तरुण त्या रस्त्याने जातांना दिसून येत आहेत तर मारहाण झाल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने ते पाहता आले नाही. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी पोलीस स्टेशनला जावून दोन्ही गटातील तरुणांची समजूत काढून वाद मिटविला.