नवी दिल्ली : कोरोना संकटाचे सावट असताना देशासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरात ६०२ जिल्ह्यांत एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (602 districts reported no corona death in last one week in india)
एका वृत्तवाहिनीनुसार, देशभरातील ७२९ जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. यातील ११६ जिल्हे असे आहे, जेथे गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० पेक्षा अधिक नाही. सदरची आकडेवारी १० फेब्रुवारीपर्यंतची आहे, असे सांगितले जात आहे. भारतात आतापर्यंत दीड लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (coronavirus india update)
कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ
महाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती गंभीर
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.
२६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सुधारणा
देशभरातील २६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठवडाभरात १० किंवा १० पेक्षा कमी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही.
कोरोना उपचाराधीन रुग्ण संख्येत घट
कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. आतापर्यंत कोरोनामुळे कमीत कमी ७३४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरणात भारत जगात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. १ मार्च २०२१ पर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे लक्ष्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. आताच्या घडीला देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाख इतकी आहे.