नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 हजार 695 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण गेल्या 24 तासांत आढळून आले आहेत. एवढेच नाही, तर गेल्या 24 तासांत तब्बल 606 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 20,783 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात तब्बल 3 लाख 31 हजार 146 एकवढे रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एकूण 6 लाख 12 हजार 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24 हजार 915 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत देशात एकूण 9,68,814 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार देशातील रिकव्हरी रेट सध्या 63.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत रिकव्हरी रेट 81.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशाच्या रिकव्हरी रेटचा विचार करत दिल्लीचा रिकव्हरी रेट अधिक आहे. राज्यातील मृत्यू दर 3 टक्के आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, तामिलनाडूमध्ये कोरोनाचे एकूणम दीडलाख रुग्ण झाले आहेत. यापैकी एक लाख लोक बरेही झाले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण -कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. येथे बुधवारी 7 हजार 9७5 नवीन रुग्णांचे निदान झाले, तर 233 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 2 लाख 75 हजार 640 झाली असून 10 हजार 928 मृत्यू झाले आहेत. राज्याचा मृत्युदर 3.96 टक्के आहे. दिवसभरात 3 हजार 606 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण 1 लाख 52 हजार 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या 233 मृत्यूंमध्ये 62 जण एकट्या मुंबईतील आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.3६ टक्क्यांवर आले आहे. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.24 टक्के आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 801 असून देशात 3 लाख 19 हजार 840 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा