नवी दिल्ली : स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमधील तेजीमुळे या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारतीय शेअर बाजाराने संपूर्ण सर्वोत्तम प्रदर्शन केले. या काळात गुंतवणूकदारांनीही ६१ लाख कोटींची घसघशीत
कमाई केली. परतावा देण्याच्या बाबतीतही भारतीय बाजार जपाननंतर दुसऱ्या स्थानी राहिला.
सेन्सेक्स-निफ्टी यांनी पहिल्या सहामाहीत १२ टक्के परतावा दिला. एप्रिल-सप्टेंबर २०२३ या काळात शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांची भांडवली मूल्य २२ टक्क्यांनी वाढले. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते कच्च्या तेलाचे वाढते भाव आणि अमेरिकन बॉण्ड यिल्डमध्ये होत असलेला फायदा यामुळे २०२३-२४ च्या दुसऱ्या सहामाहीत बाजारावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
येत्या काळात जागतिक बाजारातील कल तसेच विदेशी गुंतवणूकदारांच्या हालचाली यावरून बाजाराची दिशा निश्चित होईल, असे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. खनिज तेलाच्या किमती आणि वाहनांची होणारी एकूण विक्री याचाही बाजारावर परिणाम होईल, असेही गुंतवणूकदारांनी स्पष्ट केले आहे.
गुंतवणुकीत झालेली वाढ (कोटी रुपयांमध्ये)
श्रेणी २०२२ २०२३
विदेशी गुंतवणूकदार ६०,२०२ १,२०,५१९
म्युच्युअल फंड ९६,०३० ४०,४०८
स्था. गुंतवणूकदार १,४५,८७४ ४३,२४९
६१ लाख कोटी
रुपयांनी २०२३ च्या पहिल्या सहामाहीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
१४,७६७ कोटी
रुपयांच्या समभागांची विक्री सप्टेंबर २०२३ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली.
या गोष्टींकडे असेल लक्ष
आरबीआय ६ ऑक्टोबर रोजी पतधोरण निश्चित करणार आहे. यात रेपोरेटमध्ये बदल होण्याची शक्यता नाही.
मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयची आकडेवारी ३ ऑक्टोबर तर सर्व्हिस पीएमआयची आकडेवारी ५ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल.