शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

६३ बड्या उद्योगपतींना कर्जमाफी

By admin | Published: November 17, 2016 5:03 AM

देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ६३ बड्या उद्योगपतींना ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ६३ बड्या उद्योगपतींना ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. विशेष म्हणजे या सर्व कारखानदारांनी हेतूत: कर्ज थकवले होते. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ‘अ‍ॅडव्हान्स अंडर कलेक्शन अकाउंट’ (औका) सुविधेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.नरेंद्र मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाविरुद्ध मोहीम उघडण्याच्या नावाखाली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या आठवडाभरात बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन खर्चापुरते पैसे मिळावे म्हणून लोक देशभरात बँकांसमोर रांगा लावून उभे असताना बडे कारखानदार मात्र आधीच हजारो कोटींची कर्जमाफी मिळवून बसले आहेत.कर्ज मिळालेले हे कारखानदार ‘टॉप-१00’ थकबाकीदारांच्या यादीत होते. यापैकी ६३ उद्योगपतींना बँकेने संपूर्ण कर्जमाफी दिली आहे. ३१ उद्योगपतींना अंशत: कर्जमाफी दिली आहे, तर उरलेल्या ६ जणांकडील कर्ज बुडीत कर्जाच्या (एनपीए) यादीत घातले आहे. ३0 जून २0१६ पर्यंत बड्या उद्योगपतींना ४८ हजार कोटींची कर्जमाफी बँकेने दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)टॉप-५ उद्योगांना मिळालेली कर्जमाफी-किंगफिशर एअर लाइन्स -ही कंपनी विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या मालकीची आहे. कंपनीकडे १७ बँकांचे ६,९६३ कोटी रुपये थकले होते. त्यापैकी १,२0१ कोटी रुपये एसबीआयचे होते. ते आता माफ झाले आहेत. सहेतुक कर्ज बुडव्यांच्या यादीत मल्ल्या सर्वोच्च स्थानी आहे. कर्जमाफीनंतर थकबाकीदारांच्या यादीतून त्याचे नाव हटविले आहे.जीईटी पॉवर : ही कंपनी अजय कुमार विष्णोई यांच्या मालकीची आहे. २0१६ मध्ये ती कर्जबुडव्यांच्या यादीत आली होती. आर्थिक गैरव्यवहार व प्रकल्पांना उशीर यामुळे कंपनी तोट्यात गेली होती.केएस आॅईल : कलश आणि डबल शेर या नावाने खाद्य तेल बनविणारी ही कंपनी २0१३ मध्ये एनपीएमध्ये गेली होती. कंपनीच्या पाच कारखान्यांचा लिलाव करण्याचा प्रयत्न बँकेने केला होता, पण गिऱ्हाईकच न मिळाल्याने तो बारगळला. साई इन्फो सिस्टीम : सुनील कक्कड यांच्या मालकीच्या साई इन्फो कंपनीला २६ आॅगस्ट २0१६ रोजी सहेतुक कर्जबुडवी कंपनी घोषित केले होते. कक्कड विदेशात फरार झाले होते. त्यांना भारतात आणून अटक करण्यात आली होती. तथापि, नंतर ते जामिनावर मुक्त झाले.