पलवल: प्रेमात जात, समाज, वय गरिब, श्रीमंत काही पाहिलं जात नाही. अशाच प्रकारची एक घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील हथीन परिसरात घडली आहे. येथील एका 67 वर्षीय वृद्धानं 19 वर्षीय मुलीसोबत निकाह केलाय. निकाहनंतर दोघांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात कुटुंबियांकडून धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणीही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न करणाऱ्या दांपत्याचें यापूर्वीही लग्न झालेलं आहे. 67 वर्षीय व्यक्तीला सात मुले असून, त्या सर्वांचंही लग्न झालं आहे. चार वर्षांपूर्वी त्या व्यक्तीच्या पत्नीचें निधन झालं होतं. तर, 19 वर्षीय तरुणीचंही याआधी लग्न झालंय. तरुणीचा तिच्या गावातील एका व्यक्तीसोबत जमिनीचा वाद सुरू होता, 67 वर्षीय व्यक्ती तिला या प्रकरणात मदत करायचा आणि यादरम्यान त्यांना एकमेकांवर प्रेम जडल.
आता, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं याप्रकरणाला गांभीर्याने घेत पलवल जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक दीपक गहलावत यांना त्या तरुणीला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तर, त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती मिळवण्यासही सांगितले आहे. पोलिस उपअधिक्षक रतनदीप बाली यांनी याबाबत सांगितलं की, हथीन गावातील 67 वर्षीय व्यक्तीने नूंह जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीची लग्न केले आहे. लग्नानंतर त्या दोघांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल करत सुरक्षेची मागणी केली आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार, त्या दोघांना सुरक्षा पुरवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.