नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षअखेर सर्व अनुदान (सबसिडी) बंद करण्याच्या निर्णयानुसार, सरकारने दरमहा अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमती वाढविण्याचा निर्णय घेतल्यानुसार, शुक्रवारी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची वाढ केली आहे. यासोबत विमान इंधनाच्या आणि रॉकेलच्या दरातही वाढ करण्यात आली असून, विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरही ७३.५ रुपयांनी महागले आहे.नवीन वाढीव दरानुसार दिल्लीत आता अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत (१४.२ किलो ग्रॅम) ४८७ रुपये १८ पैसे असेल. आधी ही किंमत ४७९ रुपये ७७ पैसे होती, असे इंडियन आॅइल कॉर्पोरेशन या सरकारी तेल विपणन कंपनीने सांगितले.३१ जुलै रोजी तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ३१ जुलै रोजी लोकसभेत सांगितले होते की, पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सर्व सबसिडी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, सरकारने सरकारी तेलकंपन्यांना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दरमहा ४ रुपयांनी वाढविण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी १ आॅगस्ट रोजी तेल कंपन्यांनी प्रति सिलिंडर २ रुपये ३१ पैशांची वाढ केली होती. तथापि, दरवाढीत बरोबरी करण्यासाठी या वेळी अधिक वाढ करण्यात आली आहे.मागच्या वर्षी जुलैत दरमहा दरवाढ करण्याचे धोरण लागू करण्यात आल्यापासून, आतापर्यंत एलपीजी सिलिंडरच्या दरात ६८ रुपयांची वाढ झाली आहे. जून २०१६ मध्ये अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ४१९ रुपये १८ पैसे होती.तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरातही (एटीएफ) ४ टक्के वाढ केली आहे. आंतरराष्टÑीय पातळीवरील दरानुसार ही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनुसार विमान इंधनाचा दर आत प्रति किलो लीटर ५०,०२० रुपये झाला आहे. आधी हा दर ४८,११० रुपये होता. त्यानुसार, विमान इंधन १,९१० रुपयांनी महागले आहे. यापूर्वी १ आॅॅगस्ट रोजी विमान इंधन दरात २.३ टक्के वाढ करण्यात आली होती.1सार्वजनिक वितरणप्रणालीमार्फत विक्री होणाºया रॉकेलच्या (केरोसिन) दरातही प्रतिलीटर २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.2केरोसिनच्या बाबतीही सरकारचे एलपीजीसारखेच सबसिडी रद्द करण्याचे धोरण आहे. जुलै २०१६ पासून दर पंधरा दिवसाला २५ पैशांनी वाढ केली जात आहे. दिल्ली केरोसिनमुक्त घोषित करण्यात आले.3मुंबईत केरोसिनचा दर आता प्रतिलीटर २२ रुपये २७ पैसे असेल. देशभरात अनुदानित एलपीजीचे ग्राहक १८.११ कोटी आहेत. यात २.६ कोटी गरीब महिलांना मागच्या एका वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत कनेक्शन देण्यात आले आहे. विनाअनुदानित एलपीजीचे ग्राहक २.६६ कोटी आहेत.
सिलिंडर ७ रुपये महाग, रॉकेलचीही भाववाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:51 AM