नवी दिल्ली - लहान मुलं निरागस असतात. त्यांच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज असते. अशा परिस्थितीत पालकांना खूप जबाबदारीने वागावं लागतं. मुलांच्या आजूबाजूला अशी कोणतीही धोकादायक गोष्ट नाही ज्यातून त्यांना काही नुकसान पोहोचेल याकडे सतत लक्ष द्यावं लागतं. अलीकडेच सोशल मीडियावर एका डॉक्टरने त्यांच्याकडे आलेली एक केस ट्विटरवर शेअर केली. यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. याबद्दल माहिती देऊन त्यांना इतर पालकांनाही सावध करायचं आहे.
डॉ. मोहम्मद शैफुल यांनी ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या सात वर्षांच्या रुग्णाचा एक्स-रे रिपोर्ट शेअर केला आहे. वेळीच योग्य उपचार झाले नसते तर मुलाचा मृत्यू झाला असता. या मुलाने पन्नास पैशांचं एक नाण गिळलं होतं. जे थेट त्याच्या अन्ननलिकेत अडकलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ते दुसऱ्या वाहिनीत अडकलं असतं तर मुलांचा जीव वाचला नसता.
या प्रकरणाची संपूर्ण माहिती देताना डॉ. शैफुल यांनी त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं होतं की, एका मुलाला आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आलं आहे. मुलाने नाणं गिळलं होतं आणि त्याची प्रकृती चिंताजनक होती. हे समजताच डॉक्टरांनी प्रथम त्याच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची माहिती विचारली. त्यानंतर त्याचा एक्स-रे रिपोर्ट मागवला. अहवाल पाहिल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकरण समजलं.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या अन्ननलिकेत काहीतरी अडकलं होतं. डॉ. शैफुल यांनी रिपोर्ट पाहिल्यावर त्यांना समजलं की, ही अडकलेली वस्तू प्रत्यक्षात एक नाणं आहे. सुदैवाने नाणं श्वासनलिकेत न अडकता अन्ननलिकेत अडकलं होतं. नाणं श्वासनलिकेत अडकलं असतं तर या मुलाला श्वास घेता आला नसता. अडकल्यास. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकत होता. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून नाणं बाहेर काढलं. मुलाची प्रकृती आता स्थिर असून तो बरा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.