७ वर्षांनी दाखल गुन्ह्यात १० वर्षे शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:43 AM2018-09-19T00:43:22+5:302018-09-19T00:44:22+5:30

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; निर्दोष असल्याचा आरोपींचा कांगावा

7 years after the sentence of 10 years of sentence in the crime | ७ वर्षांनी दाखल गुन्ह्यात १० वर्षे शिक्षा

७ वर्षांनी दाखल गुन्ह्यात १० वर्षे शिक्षा

Next

- खुशालचंद बाहेती 

नवी दिल्ली : २००३ मध्ये पहिलीत असलेल्या एका मुलीवर शिलाँग येथे राहणाऱ्या नातेवाईकाने बलात्कार केला होता व याबद्दलचा गुन्हा २०१० मध्ये दाखल झाला. आरोपीने त्याला यात गोवण्यात येत असून, ७ वर्षांचा विलंब हे एकच कारण त्याला निर्दोष सोडण्यात पुरेसे असल्याचा कांगावा केला. मात्र, मेघालय उच्च न्यायालयाने आरोपीच्या अमानवी कृत्याची पशूंनाही लाज वाटेल, अशा शब्दांत सुनावत १० वर्षांची सक्तमजुरी ठोठावली.
२००३ मध्ये संबंधित मुलीला एक दिवस तिच्या शेजारी राहणाºया नातेवाईकाने शाळेतून आणले. टेलिफोन खात्यात इंजिनिअर असणाºया या नातेवाईकाने घरी कोणीही नाही याचा फायदा घेऊन स्वत:च्या घरात नेले आणि बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर मारून टाकण्याची चाकू दाखवून धमकी दिली.
यानंतर मुलगी वारंवार आजारी पडू लागली. तिचे वय वाढल्यानंतर टी.व्ही.वरील मालिकांमधून तिला आपल्यासोबत लहानपणी नेमके काय घडले होते हे समजले. ती सतत आजारी पडते म्हणून २०१० मध्ये तिच्या एका शिक्षिकेने तिचे समुपदेशन केले असता, मुलीने ही घटना सांगितली. शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून हे सांगितले. यानंतर मुलीला दवाखान्यात उपचार करून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
७ वर्षांनंतर दाखल गुन्ह्यात सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा दिली. याविरुद्ध आरोपीने मेघालय उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलात आरोपीचा ७ वर्षांनंतर गुन्हा दाखल असल्याने तो जाणूनबुजून त्याला गोवण्यासाठी दाखल केल्याचा मुद्दा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. ७ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार करणारा अमानवीच आहे. पशूंनाही याची लाज वाटेल, अशी उच्च न्यायालयाने कठोर टीका करीत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायम केली.

बलात्कारानंतर मुलीचे सततचे आजारपण याकडे कुटुंबियांचे दुर्लक्ष; पण शिक्षिकेसमोर मुलीने मुक्तपणे सांगितली घटना.
वय वाढल्यानंतर मुलीला काय घडले हे समजले. ३ वेळा तिचा आत्महत्येचा प्रयत्न. तरीही कारणांचा शोध घेण्यात कुटुंबीय अपयशी.
कुटुंबातील मुक्त संवादाच्या अभावामुळे मुलीने ७ वर्षे भोगल्या यातना.

Web Title: 7 years after the sentence of 10 years of sentence in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.