राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट
By admin | Published: March 14, 2016 12:20 AM
जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.
जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.तीन गृहनिर्माण सोसायटींची स्थापनाकानळदा रस्त्यावरील राजाराम नगराच्या जागेवर आकांक्षा गृहनिर्माण सोसायटी, अक्षय गृहनिर्माण सोसायटी व अक्षरा गृहनिर्माण सोसायटीची २००७ मध्ये स्थापना केली. या सोसायटीत शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक यांच्यासह शासकीय नोकर व काही खाजगी व्यावसायिकांना प्लॉट देण्यात आले.सहा ते १५ लाखांपर्यंत घरेशासकीय कर्मचार्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांना सुरुवातीला चार लाख ३१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्ज प्रकरणी झालेले नसल्याने पुन्हा दीड लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. सरकारी नोकरी नसलेल्या नागरिकांना तब्बल १४ ते १५ लाख रुपये मोजून घर दिले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. पाणी व वीजसाठी स्वतंत्र रक्कमगृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांना घर देतेवेळी पिण्याचे पाणी व वीज याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याबदल्यात २५ हजार रुपयांची जादा रक्कम प्रत्येक कुटुंबाकडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या भागातील नागरिकांना ना वीज मिटर मिळाले ना पिण्याचे पाणी.रहिवाशांचे हालगृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सुरुवातील या भागात एक बोअरींग करून दिली आहे. या बोअरींगवरून राजाराम नगरातील ७० ते ७५ कुटुंब पाणी भरत आहेत. त्यातच पिण्याचे पाणी हे शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, खडके चाळ या भागातून आणत आहेत. काही कुटुंबांनी स्वतंत्र बोअरींग करीत पाण्याची व्यवस्था केली आहे.ग्रामपंचायतीची टोलवाटोलवीराजाराम नगर हा भाग आव्हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे. या भागात मनपाची स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा नसल्याने नागरिकांनी आव्हाणे ग्रामपंचायतीला विनंती करून पिण्याचे पाणी व गटारी उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती केली. मात्र आव्हाणे ग्रामपंचायतीने अद्याप दखल घेतलेली नाही. मनपाने वाघ नगराच्या धर्तीवर या भागापर्यंत पाईपलाईन करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.