सराफ दुकानातून ७० हजारांची चोरी गुन्हा : बाजारपेठेत घडला प्रकार
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM
संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंसह लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंसह लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सुवर्णकार संजय नारायण शहाणे (रा. गणेशनगर) हे नियमितपणे त्यांच्या मालकीचे बाजारपेठेत महात्मा फुले चौकातील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या एका बाजूच्या लोखंडी शटरचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील लोखंडी तिजोरीची चोरी केली. या तिजोरीमध्ये सुमारे ७० हजार रूपये किमतीचे चांदीचे कोल्हापूरी घडणीचे दागिने होते. सकाळी शहाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी भेट देवून पाहणी केली. बाजारपेठेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले करीत आहेत. (प्रतिनिधी) चौकट-बाजारपेठेत धाडसी चोरी करणार्या आरोपींचा शोध लावण्यासाठी अहमदनगरहून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पथकातील श्वानाने अकोले नाक्यापर्यंत माग काढला. मात्र पुढे चोरटे कोणत्या दिशेला गेले, हे समजू शकले नाही. ------------------------------------------------------घरासमोरुन बोलेरो जीप लांबविलीसंगमनेर : अज्ञात चोरट्यांनी शहरामध्ये दिल्लीनाका परिसरात घरासमोर लावलेली सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दिल्लीनाका परिसरातील कोल्हेवाडी रस्त्यावर राहणार्या पोपट रावसाहेब अरगडे यांच्या घराच्या आवारात लावलेली सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीची बोलेरो जीप (क्रमांक एम. एच. १७, व्ही. ५५८०) चोरून नेली. सकाळी जीपची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोपट अरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक घनवट करीत आहेत. (प्रतिनिधी)