आठ महिन्यात शहर-जिल्?ात 72 गुन्हे
By admin | Published: September 08, 2015 2:08 AM
सोलापूर : शहर व जिल्?ात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2015 या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये 72 गुन्हे घडले. यात शहरात 9 तर जिल्?ात 63 गुन्?ांचा समावेश आहे. शहरातील सहा गुन्?ांची तर जिल्?ातील 42 गुन्?ांची कार्यवाही झाली आहे. अन्य गुन्?ासंबंधी कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
सोलापूर : शहर व जिल्?ात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2015 या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये 72 गुन्हे घडले. यात शहरात 9 तर जिल्?ात 63 गुन्?ांचा समावेश आहे. शहरातील सहा गुन्?ांची तर जिल्?ातील 42 गुन्?ांची कार्यवाही झाली आहे. अन्य गुन्?ासंबंधी कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ही माहिती सादर करण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, उपविभागीय पोलीस अधीक्षक दिलीप चौगुले, प्र. सहायक आयुक्त समाजकल्याण चौगुले, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे, प्रांताधिकारी र्शीमंत पाटोळे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एन. एच. शेख, पोलीस निरीक्षक घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे म्हणाले की, या प्रकरणात दोषी व्यक्तींवर तत्काळ खटले दाखल करावेत तसेच फरारी आरोपींचा तातडीने शोध घेण्यात यावा अशा सूचना केल्या. त्यांनी शहर व ग्रामीण विभागातील प्रलंबित गुन्?ाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. (प्रतिनिधी)