केरळमधील महापुरात 73 जणांचा मृत्यू, मोदींची फोनवरुन विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:02 PM2018-08-16T12:02:21+5:302018-08-16T12:07:56+5:30

केरळमध्ये 8 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला असून एका

73 people die in kerala's Flood, Modi's phone calls to CM pinarayi vijayan | केरळमधील महापुरात 73 जणांचा मृत्यू, मोदींची फोनवरुन विचारणा

केरळमधील महापुरात 73 जणांचा मृत्यू, मोदींची फोनवरुन विचारणा

Next

कोची - केरळमध्ये 8 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला असून एका बसमध्ये 81 पर्यटक अडकल्याची माहिती आहे. या बसला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. तर, येथील मुसळधार पावसाचा फटका बस, रेल्वे आणि विमानसेवेलाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही फोन करुन केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्याशी पूरस्थितीबाबत संवाद साधला.  


केरळमधील वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिदक्षतेचा इशारा म्हणून कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, 18 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. कोची विमानतळानजीक असलेल्या पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यातच येथील वायंड, कोझिकोडे, कन्नूर, केसरगोडे, मलप्पूरम, पलक्कड, इडुक्की तसेच इरनाकुलम जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने जाहीर केला आहे. कोझीकोड, इरानल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे गुरुपायर-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, दिबुगढ-कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस आणि गांधीधाम-तिरुनेलवली हमसफर एक्स्प्रेस या चार गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.


82 पर्यटक अडकले


12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका



 

Web Title: 73 people die in kerala's Flood, Modi's phone calls to CM pinarayi vijayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.