लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जानेवारीपासून सुरू झालेल्या देशव्यापी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेने सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. देशभरातील ७५ कोटी लोकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी ६ राज्यांमध्ये १०० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस प्राप्त झाला आहे. डिसेंबरपर्यंत देशभरातील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
या राज्यांमध्ये पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण
गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम, लक्षद्वीप, दादरा-नगरहवेली, दमण-दीव
जगात दुसऱ्या क्रमांकावर
- एकूण लसीकरणाच्या बाबतीत भारत चीनच्या थोडा मागे आहे.
- चीनमध्ये आतापर्यंत लसीचे २ अब्ज १४ कोटी डोस देण्यात आले आहेत.
- लसीकरणाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका आणि ब्राझील अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
लसीकरणाची सद्य:स्थिती
७५ कोटी एकूण लसीकरण, ५७,००,४६,६५५ पहिला डोस प्राप्त झालेले, १८,०२,३७,९१४ दुसरा डोस प्राप्त झालेले
असा गाठला टप्पा
१० कोटी : ८५ दिवस११ ते २० कोटी : ४५ दिवस२१ ते ३० कोटी : ३० दिवस३१ ते ४० कोटी : २४ दिवस४१ ते ५० कोटी : २० दिवस५१ ते ६० कोटी : १९ दिवस६१ ते ७० कोटी : १३ दिवस७१ ते ७५ कोटी : ६ दिवस