मुंबई : सामान्य लोकांकडून पैसे उकळत त्यांना बेकायदा अमेरिका व कॅनडा येथे पाठविणाऱ्या टोळीशी निगडीत २९ ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोगस कागदपत्रे तयार करत लोकांना अवैधरीत्या अमेरिका व कॅनडा येथे पाठविणाऱ्या एका टोळीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांना अटक केली होती. तेथील पोलिसांनी या प्रकरणी एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणातील पैशांची व्याप्ती व आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेत ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे.