शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
2
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
3
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
4
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
5
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
6
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
7
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
8
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
9
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
10
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
11
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
12
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
13
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
14
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
15
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
16
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
17
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
18
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
19
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
20
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!

जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात ७५ रजिस्टर जीर्ण : भांडार विभागाला तब्बल १० वेळा पत्र देऊनही दुर्लक्ष

By admin | Published: June 14, 2016 12:22 AM

जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे.

जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वेळा पत्र पाठवून पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागातील नोंदीच धोक्यात येण्याची भिती आहे.
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे दाखले नागरिकांना विविध शासकीय व शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असतात. मात्र या महत्वाच्या विभागाबाबत मनपा प्रशासनाची अत्यंत अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड गहाळ
जुनी नपातून मनपाच्या इमारतीत स्थलांतर करताना जन्म-मृत्यू विभागातील नोंदीचे अनेक रजिस्टरच गहाळ झाले आहेत. त्यात जन्माच्या नोंदींचे १९५६, १९७७, १९७९, १९६७, १९६८च्या डिसेंबर महिन्याच्या नोंदी असलेले रजिस्टर गहाळ झाले आहेत. तर मृत्यूच्या १९५२, १९५३,१९५४, १९५६, १९५९, १९६१ यावर्षीर्ंच्या नोंदीचे रजिस्टर गहाळ झाले आहेत. त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील टिपणीही तयार आहे. मात्र तरीही आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कालावधीत जन्म अथवा मृत्यूची नोंद असल्यास त्याचे दाखले नागरिकांना मिळू शकत नाहीत. त्यांना कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र करून घेण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मनपाच्या चुकीची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहे.
संगणकीकरण आवश्यक
जन्म-मृत्यूच्या नोंदींचे रजिस्टर ठेवण्यासोबतच त्यांचे संगणकीकरणही करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही मनपाचे दूर्लक्ष झाले आहे. या विभागातील रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. मनपात १९०१ पासूनच्या नोंदींचे रेकॉर्ड आहे. त्यापैकी १९०० ते १९२३ पर्यंतच्या नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या आता कुणालाच वाचता येत नसल्याने ते रजिस्टर पडून आहेत. मात्र १९२३ पासूनचे रेकॉर्ड मराठीत आहे. ते हाताळून जीर्ण झाले आहे. अगदी २०१३ च्या नोंदींचे रजिस्टर देखील जीर्ण होऊन त्यातील पाने मोकळी झाली आहेत. याबाबत भांडार विभागाला पानांचे लॅमिनेशन व रजिस्टरचे बाईंिडंग करण्याबाबत तब्बल १० वेळा पत्र लिहून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
इतर अडचणींकडेही कानाडोळा
जन्म-मृत्यू नोंद विभागातील मृत्यू पावती पुस्तके, मृत्यू फॉर्म नं.४ इंग्रजी, जन्म-मृत्यू पुस्तके नोंदणी रजिस्टर व अनुपलब्धता प्रमाणपत्र व त्याचे मुळ कव्हरिंग लेटर संपलेले आहे. त्याबाबतही पाठपुरावा सुरूआहे.