नवी दिल्ली:दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) तैनात असलेल्या सीमाशुल्क विभागाने गुरुवारी एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक-एक करून सात घड्याळे जप्त करण्यात आली. या घड्याळांची एकूण किंमत 28 कोटी 17 लाख 97 हजार रुपयांहून अधिक आहे. पण ज्या घड्याळाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, त्याची किंमत 27 कोटींहून अधिक आहे. हे घड्याळ हिऱ्यांनी जडलेले आहे. जप्त केलेली घड्याळे ROLEX, PIAGET आणि JACOB & Co. कंपन्यांची आहेत. या सगळ्या महागड्या ब्रँड्समध्ये 27 कोटींच्या घड्याळाने सगळ्यांचे लक्ष वेधले.
घड्याळावर डझनभर हिरे जडलेले अधिकार्यांनी सांगितले की, आठ घड्याळांपैकी एक अमेरिकन दागिने आणि घड्याळ निर्माता जेकब अँड कंपनीच्या मालकीचे आहे. या घड्याळाची किंमत 27 कोटी, 9 लाख, 26 हजार 51 रुपये आहे. 27 कोटींहून अधिक किमतीच्या या घड्याळात सोने आणि हिरे जडले आहेत. याशिवाय, घडाळ्यात रत्ने आणि डझनभर पांढरे हिरे लावण्यतत आले आहे
76 पांढरे हिरे जडलेलेऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्मवर या JACOB & Co. कंपनीच्या घड्याळाबाबत महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. 27 कोटींहून अधिक रुपये किंमत असलेल्या घड्याळाचे नाव Jacob & Co. Billionaire III Baguette White Diamonds 54 x 43 mm watch आहे. हे घड्याळ 76 पांढऱ्या हिऱ्यांनी जडले असून ते बनवण्यासाठी 18 कॅरेट पांढरे सोनेही वापरण्यात आले आहे. घड्याळाच्या डायलवरही हिरे दिसतात. हे घड्याळ स्वित्झर्लंडमध्ये बनवले आहे आणि दोन वर्षांच्या वॉरंटीसह येते. पण, हे जगातील महगाडे घड्याळ नाही.
जगातील सर्वात महागडे घड्याळजगातील सर्वात महागडे घड्याळ म्हणजे ग्राफ डायमंड्स हॅलुसिनेशन घड्याळ (Graff Diamonds Hallucination) आहे. रिपोर्टनुसार, या घड्याळात 110 कॅरेटचे हिरे आहेत. या घड्याळाची किंमत $5.50 मिलियन (सुमारे 400 कोटी रुपये) आहे. या घड्याळाचा डायल विविड यलो, फॅन्सी इंटेन्स पिंक, फॅन्सी इंटेन्स ब्लू, फॅन्सी लाइट पिंक, फॅन्सी लाइट ग्रे ब्लू, फॅन्सी इंटेन्स ब्लू, फॅन्सी ग्रीन आणि फॅन्सी ऑरेंज या रंगात हिरे जडलेला आहे.
इतर घड्याळांची किंमतविमानतळावर जप्त करण्यात आलेल्या इतर घड्याळांच्या किंमतीबद्दल बोलायचे तर PIAGET कंपनीचे घड्याळ 30 लाख, 95 हजार, 400 रुपये आहे. याशिवाय रोलेक्सच्या इतर चार घड्याळांची किंमत प्रत्येकी 15 लाख रुपये आहे.