नवी दिल्ली : देशातील १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी संलग्न बोनस देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सणासुदीच्या हंगामापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडित बोनस म्हणून ७८ दिवसांचा पगार देण्याचा प्रस्ताव दिला होता. (प्रतिनिधी)
रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस
By admin | Published: October 08, 2015 3:54 AM