शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

7th Pay Commission: खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचे संकेत, पेन्शनधारकांनाही लाभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 4:13 PM

7th Pay Commission for central government employees, pensioners: जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारच्या (Central government) महसुलावर परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्य़ावर रोख लावली आहे. सरकारने जानेवारी 2020 पासून महागाई भत्ता रोखला आहे. जून 2021 पर्यंत याचा एकही रुपया कर्मचाऱ्यांना (Employee) दिला जाणार नाही. ही मुदत संपायला महिना बाकी असताना केंद्राकडून काही संकेत मिळू लागले आहेत. (DA hike of central governmentt employees, how central government employees salary, pension will be AFFECTED?)

जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकारे हा डीए 17 टक्क्यावरून वाढून 28 टक्के झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, सरकारने यावर गेल्या वर्षी जानेवारीपासून रोख लावली आहे. 

पीएफचे कॅल्क्युलेशन नेहमी वेतन आणि महागाई भत्त्याला जोडून केले जाते. यामुळे महागाई भत्ता वाढला तर त्याचा परिणाम पीएफवाढीवरही होणार आहे. तसेच डीएमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या एचआरए, ट्रॅव्हल अलाऊन्स आणि मेडिकल अलाउन्सवर थेट परिणाम होणार आहे. यामुळे डीए 17 वरून 28 टक्के झाल्याने सॅलरी वाढणारच आहे, त्याबरोबर पीएफमध्ये देखील वाढ होणार आहे. 

पीएफ बॅलन्स वाढल्याने त्यावरील व्याजही वाढणार आहेत. केंद सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ हा बेसिक सॅलरी आणि डीएच्या आधारावर ठरतो. अशावेळी पीएफमध्येही वाढ होणार आहे. जर रोखलेला महागाई भत्ता मिळाला तर ५८ लाख पेन्शनरांनाही फायदा होणार आहे. 

काय असतो महागाई भत्ता?महागाई भत्ता हा पगाराचाच एक भाग असतो. यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या एक निश्चित टक्के रक्कम ठरविली जाते. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. हा भत्ता वेळोवेळी वाढविला जातो. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळतो.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन