भुवनेश्वर : दिवाळीच्या तोंडावर ओडिशात बुधवारी तीन ठिकाणी फटाक्यांचे स्फोट होऊन लागलेल्या आगींमध्ये एकूण आठ जण ठार झाले, तर चार जणांचे डोळे जाण्यासह इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर जिल्ह्यात फटाक्यांच्या बेकायदा कारखान्यात स्फोट होऊन सहा लोक ठार झाले, तरसहा गंभीररीत्या भाजले. मृतांमध्ये कारखान्याच्या मालकाच्या मुलाचाही समावेश आहे.पुरी जिल्ह्याच्या पिपिली गावातही फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटात एकाचा मृत्यू झाला व चौघांचे डोळेगेले. राऊरकेला शहरात फटाक्याच्या दुकानास लागलेल्या आगीत एक जण ठार झाला व अनेक जखमी झाले.जूनमध्ये बालाघाट जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यास लागलेल्या आगीत २५ मजूर ठार तर आठ जण जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)
ओडिशामध्ये फटाक्यांच्या स्फोटांत ८ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:50 AM