ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १ - छत्तीसगड-तेलंगणच्या सीमेजवळ सुकमा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत नक्षलवादी व पोलिसांदरम्यान झालेल्या चमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत.
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खम्मम जिल्ह्यातील चारला मंडल येथून १५ किमी अंतरावरील गोट्टीपाडू येथील जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांदरम्यान चकमक उडाली. काही नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच तेलंगण व छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करूत, सापळा रचून त्यांना घेरले. नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार करताच पोलिसांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले असून त्यात ५ महिलांचा समावेश आहे. तेसच पोलिसांनी घटनास्थळावरून एक ए.के.४७, दोन एसएलआर आणि .३०३ रायफल्स जप्त केल्या.