नवी दिल्ली : एकेकाळी ज्या अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असायची त्या अभियांत्रिकीबद्दलचे आकर्षण कमी होताना दिसत आहे. आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या म्हणण्यानुसार, २०० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ही महाविद्यालये बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. दुसऱ्या आणि तिसºया दर्जाचे हे अभियांत्रिकी महाविद्यालये आता प्रवेश देणार नाहीत. यावर्षी अभियांत्रिकीच्या ८० हजार जागा कमी होण्याचा अंदाज आहे. चार वर्षांत ३.१ लाख जागा कमी होणार आहेत. २०१६ पासून अभियांत्रिकीच्या जागांची संख्या कमी होत चालली आहे. एआयसीटीईच्या माहितीनुसार, जवळपास ७५ हजार जागा दरवर्षी कमी होत आहेत. २०१६-१७ मध्ये अंडरग्रॅज्युएट स्तरावर प्रवेश क्षमता १५,७१,२२० होती. प्रत्यक्षात ७,८७,१२७ प्रवेश झाले. म्हणजे, यात ५० टक्के घट झाली. २०१५-१६ मध्ये एकूण प्रवेश क्षमता १६,४७,१५५ होती. प्रत्यक्षात प्रवेश ८,६०,३५७ प्रवेश झाले. यात ५२ टक्के घट झाली. २०१६-१७ मध्ये आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीचे शिक्षण देणाºया ३,४१५ संस्थांपैैकी ५० टक्के संस्था बंद झाल्या आहेत. बंद करण्यास अर्ज केला आहे त्यापैकी बहुतांश संस्थांत गत तीन वर्षांत २० टक्के प्रवेश कमी झाले आहेत. या संस्था उच्च दर्जाच्या नसल्यामुळे विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास प्राधान्य देत नाहीत. याउलट आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशांची संख्या वाढत आहे. या संस्थांमध्ये प्रवेश क्षमता ३०० ते ४०० आहे.>नवीन प्रवेश नाही..एआयसीटीईच्या माहितीनुसार, जवळपास २०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होणार असली, तरी सध्याच्या बॅच पदवीधर होईपर्यंतच ते चालू राहतील आणि नवीन प्रवेश देण्यात येणार नाहीत. तथापि, इंंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थांच्या प्रवेशासाठी अद्यापही स्पर्धा आहे.
८0 हजार जागा घटणार, २०० अभियांत्रिकी महाविद्यालये होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:08 AM