नवी दिल्ली - माणसाच्या आयुष्यात सर्वात सुखदचा काळ म्हणजे म्हातारपणीचा काळ असं म्हटलं जातं. मुला-बाळांची लग्न केल्यानंतर, आपलं आयुष्याचं कर्तव्य बजावल्यानंतर साठीनंतर घरी बसून आरामात जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्य जगायचं असतं. मात्र, प्रत्येकाच्याच नशिबी हे सुख नसतं. अनेकांना उतारवयातही संघर्ष आणि दोन वेळच्या जेवणासाठी दररोज काम करावे लागते. दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय रामबेटी यांचीही अशीच कहानी आहे.
दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीचं हाड मोडल्याने चालताना त्रास होतो. या आजीबाईला संपूर्णता वाकून चालावे लागते, तरीही रामबेटी परिसरातील फिरून भाजलेली कणसं विकतात. 2 नातवंडांचा मोठ्या जिद्दीने सांभाळ करतात. केट्टो या संस्थेच्या सहाय्याने त्यांना मदत करण्यात येत आहे.