शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

आश्चर्य : 80 वर्षांच्या सासूबाईंनी सुनेसोबत फक्त 13 दिवसांत जिंकली कोरोनाची लढई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:39 PM

या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देयापूर्वी गुजरातमधील 75 वर्षांच्या विमलाबेन यांनीही कोरोनाचा पराभव केला आहेइच्छाबेन पटेल यांना आपल्या सुनेसह गांधीनगरमधील सिव्हिल रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होतेदोघींचेही कोरोना रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आले आहेत

गांधीनगर :गुजरातमधील गांधीनगर येथील 75 वर्षांच्या विमलाबेन कानाबार यांच्यानंतर आता एका 80 वर्षांच्या इच्छाबेन पटेल यांनीही कोरोनासोबतची लढाई जिंकली आहे. इच्छाबेन पटेल यांना आपल्या सुनेसह गांधीनगरमधील सिव्हिल रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. या दोघींनी केवळ 13 दिवसांतच कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. इच्छाबेन पटेल आणि त्यांची सून पीनलबेन यांना दुबईवरून आलेला नातू उमंग पटेल याच्याकडून संसर्ग झाला होता.

10 दिवसांपासून घरी गेले नाही डॉक्टर अरूण -गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर अरूण मकवाना हे गेल्या 10 दिवसांपासून घरी गेले नाही. ते कोरोना संक्रमितांवर उपचार करत आहेत. ते म्हणाले घरात माझा एक वर्षाहूनही छोटा मुलगा आहे. त्याला संक्रमण होऊनये म्हणून आपणच 10 दिवसांपासून घरी गेलेलो नाही.

येथेच काम करणाऱ्या डॉ. अंजुम जोबान सांगतात, की ड्यूटीवर येताना पती आणि कुटुंबातील इतर सदस्यही हिंमत वाढवतात. मी ते देत असलेल्या धिरामुळेच हे काम व्यवस्थित पणे पार पाडू शकते. 

देशातील अनेक भागांतील डॉक्टर आपले कुटुंब दूर ठेऊन कोरोनाविरोधात लढत आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी तेच सध्या देव बनले आहेत.

पंजाबमधील 81 वर्षांच्या आजीबाईंनीही  जींकली कोरोनाची लढाई - पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील तब्बल 81 वर्षांच्या कुलवंत निर्मल कौर यांनी, संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला धोबीपछाड दिली आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशनबरोबरच पाच स्टेंट्सदेखील आहेत. असे असतानाही त्यांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. त्या सोमवारी येथील मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी गेल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातdoctorडॉक्टरPunjabपंजाबhospitalहॉस्पिटलIndiaभारत