ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद, दि. 30 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या छापेमारीत आयएएस अधिका-याकडे सापडलेली संपत्ती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एसीबीने परिवहन विभागाचे उपायुक्त आयएएस अधिकारी ए मोहन यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्ब्ल 800 कोटींचं घबाड एसीबीने जप्त केलं आहे. ए मोहन यांच्या आंधप्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकमधील ठिकाणांवर छापेमारी करत ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
एसीबीने ए मोहन यांना अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे. एसीबीने सलग दोन दिवस केलेल्या छापेमारीत ही सगळी मालमत्ता जप्त केली आहे. ए मोहन यांच्या घरात हिरे तसंच मौल्यवाने खडेदेखील सापडले आहेत. ए मोहन यांच्या बँकेतील लॉकरची तपासणी अद्याप सुरु आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
Kakinada(Andhra): Rs 800 crore assets seized after raid by ACB on Dy transport commissioner of E Godavari A Mohan. pic.twitter.com/HPu5EuhJJv— ANI (@ANI_news) April 30, 2016