संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:58 PM2023-09-18T18:58:22+5:302023-09-18T19:02:53+5:30

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं

800 of my brothers in Parliament; Supriya Sule's famous speech on irrigation scam investigation for narendra modi | संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

googlenewsNext

नवी दिल्ली - इंडिया आघाडीच्या बैठकीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं होतं. काँग्रेस व राष्ट्रवादीवार भ्रष्टाचार व घराणेशाहीचा आरोप मोदींकडून होत असल्याचा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर, उत्तर देताना पवार यांनी मोदींना थेट चॅलेंजच दिलं आहे. आता, खासदार सुप्रिया सुळे यांनीही संसदेतील विशेष अधिवेशनात भाषण करताना शरद पवारांची री ओढली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने जर भ्रष्टाचार केला असेल, तर सखोल चौकशी करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी थेट संसदेतून मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे.

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. आता, सुप्रिया सुळेंनीही थेट संसदेतून अजित पवारांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे. कारण, मोदींनी भाषणात उल्लेख करताना सहकार आणि इरिगेशनचा उल्लेख केला. त्यावेळी, हे दोन्ही खात्याचा कारभार अजित पवार यांच्याकडेच होता. त्यामुळे, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

संसंदेतील भाषणात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आल्यानंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता इरिगेशन घोटाळा, बँक घोटाळ्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं होतं. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की, पंतप्रधानांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी, आमचा तुम्हाल संपूर्ण पाठिंबा आहे. केवळ दोनच नाही, तर आणखी ४ जसं एपीएमसी वगैरे अशा घोटाळ्यांचेही आरोप आहेत. इथं नात्याचा मुद्दा नाही. कारण, संसदेत माझे ८०० भाऊ आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं नाव न घेता संसदेत जोरदार भाषण केलं. 



भ्रष्टाचाराविरुद्ध पंतप्रधानांना जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सर्व नेते आता भाजपामध्ये आहेत. महाराष्ट्रासह इतरही राज्यात तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, आपण या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करावी, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी संसदेतील भाषण गाजवलं. 
 

Web Title: 800 of my brothers in Parliament; Supriya Sule's famous speech on irrigation scam investigation for narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.