डायबेटीज, हायपरटेंशन अन् बरच काही, या 81 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली कोरोनाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:21 PM2020-04-06T16:21:15+5:302020-04-06T16:35:15+5:30
कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे.
मोहाली - म्हणतातना, प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असेल, तर कोणत्याही संकटावर अगदी सहजपणे मात करता येते. मग वय काहीका असेना. याची प्रचिती आली आहे पंजाबमध्ये.पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील तब्बल 81 वर्षांच्या कुलवंत निर्मल कौर यांनी, संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला धोबीपछाड दिली आहे.
कुलवंत यांनी कोरोना झाला असतानाही हार मानली नाही. यामुळेच त्यांना कोरोनावर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे त्या 81 वर्षांच्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांना मधुमेह, हायपरटेंशनबरोबरच पाच स्टेंट्स देखील आहेत. असे असतानाही त्यांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. त्या सोमवारी येथील मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी गेल्या.
कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे.
या वृद्धांनीही दिली आहे कोरोनाला टक्कर अन् जिंकली लढाली -
यापूर्वी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एका कोरोनाग्रस्त व्यक्तीला आणि त्यांच्या पत्नीला पूर्णपणे बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की थॉमस अब्राहम (93) आणि त्यांची पत्नी मरियम्मा (88) हे कोट्टायमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय 9 मार्चपासून जीनव-मरणाशी संघर्ष करत होते. यात त्यांचा विजय झाला.
मुलगा आणि सुनेपासून झाला होता संसर्ग
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसा, 'थॉमस आणि मरियम्मा आता ठीक आहेत. त्यांची कोरोनाव्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.' ते केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील रन्नी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा, सून आणि नातू गेल्या महिन्यात इटलीहून परतले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.