नवी दिल्ली - नोएडा पोलिसांनी 81 वर्षीय एका चित्रकाराला डिजिटल बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मौरिस रायडर असं आरोपीचं नाव आहे. डिजिटल रेप या शब्दावरुन ऑनलाईन शोषण किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लैंगिक छळ केल्याची कल्पना डोळ्यासमोर उभी राहते, मात्र तसे नाही. मग डिजिटल रेप आणि व्हर्च्युअल रेपमध्ये काय फरक आहे, असा प्रश्न निर्माण होतो. कायद्यामध्ये डिजिटल रेप आणि व्हर्च्युअल रेपचा उल्लेख आहे का, असेल तर शिक्षेची तरतूद काय, असा प्रश्न आपल्याला पडतो.
पीडित युवतीसोबत राहणाऱ्या महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, 17 वर्षीय युवतीसोबत 81 वर्षीय वृद्धाने डिजिटल रेप आणि छेडछाड केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या तपासात आलेल्या माहितीनुसार, आरोप स्वत:ला मुलीचा संरक्षण असल्याचे सांगत आहे. जेव्हा पीडित युवती 10 वर्षांची होती, तेव्हा मौरिसने तिला आपल्या घरी आणले होते. मौरिसने पीडित युवतीच्या वडिलांना तिला चांगले शिक्षण देऊन एक प्रतिष्ठित नागरिक बनविण्याचं कबूल केलं होतं. मात्र, घरी आणल्यानंतर मुलीचे यौन शोषण करण्यात आले. तिला मारहाणही करत होता. अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी लैंगिक चाळे करत होता.
मौरिस हा 22 वर्षांपूर्वी पत्नीसोबत प्रयागराज येथून नोएडाला आला होता. तेव्हापासून तो येथेच राहतो. दरम्यान, एका फोटो प्रदर्शनात दिल्लीतील एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. ती महिला मौरिससोबत राहू लागल्याने त्याची पत्नी नाराज होऊन प्रयागराजला निघून गेली. डिजिटल रेपमधील पीडिता ही मौरिसच्या शिमला येथील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची मुलगी आहे.
डिजिटल रेप काय आहे?
डिजिटल रेप चा अर्थ रिप्रोडक्टिव ऑर्गन ऐवजी शरीराच्या कुठल्याही अंगास जसे की, बोटे, अंगठा किंवा कुठल्यातरी वस्तूचा वापर करून सेक्स करने होय. हा शब्द दोन शब्द डिजिट आणि रेप पासून पुढे आला आहे. इंग्रजीत डिजिट चा अर्थ अंक होतो. तसेच, बोटं, अंगठा, पायची बोटं, जसे की शरीराच्या कुठल्याही अंगाला डिजिट म्हटले जाते. म्हणजेच, कुठल्याही महिलेस तिच्या सहमतीशिवाय पेनिसऐवजी करण्यात आलेल्या यौन उत्पीड़नला डिजिटल रेप असं म्हटले जाते. ज्यामध्ये, आरोपी शारिरीक दृष्ट्या पीडितेजवळ हजर असतो. सन 2013 मध्ये यासंदर्भात एँटी रेप लॉ अनुसार कायदाही बनला आहे.