शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

ढिगाऱ्याखाली ८२ तास मृत्यूशी झुंज

By admin | Published: April 29, 2015 11:35 PM

शनिवारच्या भीषण भूकंपात कोसळलेल्या एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या माणसाला दुर्घटना घडल्यानंतर ८२ तासांनी फ्रेंच मदत पथकाने सुखरूप बाहेर काढले

जिद्दीचा विजय : फ्रेंच बचाव दलाने काढले सुखरुप बाहेर, जिवंत राहण्यासाठी प्राशन केले मूत्र; मदत न पोहोचल्याने पंतप्रधानांवर रोषकाठमांडू : शनिवारच्या भीषण भूकंपात कोसळलेल्या एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या माणसाला दुर्घटना घडल्यानंतर ८२ तासांनी फ्रेंच मदत पथकाने सुखरूप बाहेर काढले असून, चार दिवस ढिगाऱ्याखाली जिवंत राहण्यासाठी आपण मूत्रही प्यालो, असे त्याने सांगितले. रिषी खनाल (२७), असे या युवकाचे नाव आहे. शनिवारी काठमांडूतील हॉटेलमध्ये दुपारचे जेवण घेऊन तो दुसऱ्या मजल्यावर आला होता. तेव्हाच भूकंपाने सारेकाही हलू लागले आणि हॉटेलची इमारत पाहता, पाहता कोसळली. त्याचा पाय ढिगाऱ्याखाली अडकला होता; पण सारे शरीर लाकडी खांबाखाली सुरक्षित होते. सुरुवातीला आपली सुटका होईल, असे मला वाटत होते; पण मंगळवारी त्याच्या आशा संपल्या होत्या. आता आपण मरणार असे त्याला वाटत होते. त्याची नखे पांढरी झाली होती आणि ओठ फाटले होते. आपल्या मदतीला आता कोणीही येणार नाही, आता आपण मरणार असेच मला वाटत होते, असे त्याने सांगितले. बुधवारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असून, त्याचे नातेवाईक त्याच्या सोबत आहेत. मदत पथकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो छोटे, छोटे खडे मारत होता. अखेर फ्रेंच मदत पथकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. पंतप्रधानांवर भूकंपपीडितांचा रोषनेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आज भूकंपपीडितांची भेट घेण्यासाठी त्यांच्या छावण्यांकडे गेले, पण त्यांना संतापाचा सामना करावा लागला. भूकंपाचा धक्का बसून आता चार दिवस उलटले असून, अजूनही मदत मिळत नसल्याने लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. दरम्यान, सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.मुख्य बसस्थानकावरही लोकांचा संताप दिसून आला. काठमांडू शहराबाहेर जाण्यासाठी तिथे लोकांनी गर्दी केली होती; पण ठरलेल्या बस न आल्यामुळे लोक चिडले. संतप्त लोकांना आवरण्यासाठी दंगल पोलीस बोलवावे लागले. आतापर्यंत ६ हजार मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. शनिवारच्या ७.९ मॅग्निट्यूड भूकंपात हजारो घरे व इमारती कोसळल्या आहेत. त्या ढिगाऱ्याखाली अजूनही मृतदेह आहेत, असे उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी सांगितले. अद्याप दुर्गम भागापर्यंत मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे तिथे गेल्यानंतर खरा मृत्यूचा आकडा बाहेर येणार आहे. ११ हजार लोक जखमी आहेत. दुर्गम भागात अजूनही मदत पथके पोहोचलेलीच नाहीत. मुसळधार पाऊ स व दरडी कोसळल्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. दुर्गम भागात मदत पोहोचवणे अत्यंत कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोठे आहे मदत? आम्ही थंडीत उपाशी कुडकुडत असताना सरकार कोठे होते? असा प्रश्न लोक विचारत आहेत. सरकारी मदत येथे आहे असे आम्ही ऐकत आहोत, कोठे आहे ती मदत? असेही लोक विचारत आहेत. मदत घेऊन येणारी विमाने तंबू, कोरडे अन्न व औषधे दुर्गम भागात टाकत आहेत. पण अद्यापही अनेक दुर्गम गावात मदत पोहोचलेली नाही, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. जेव्हा हेलिकॉप्टर खाली उतरते तेव्हा लोक त्यावर तुटून पडतात, असेही हा प्रवक्ता म्हणाला. गोरखा, धाडिंग, सिंधुपालचोक, कावरे, नुवाकोट या भागात मदत पोहोचली नाही. ४रिषी अडकला होता तिथे कोणताही आवाज येत नव्हता आणि तेथील आवाज बाहेरही पडत नव्हता. तिथे खायला, प्यायलाही काही नव्हते. अखेर मला माझे मूत्र प्यावे लागले, असे रिषीने सांगितले. ४रिषी हा हॉटेलचा कर्मचारी आहे की हॉटेलमध्ये उतरलेला ग्राहक, हे स्पष्ट झाले नाही. त्याला बाहेर काढल्यानंतर लगेचच शस्त्रक्रियेसाठी आत नेण्यात आले. ४सुखरूप बाहेर आल्यानंतर छान वाटते आहे, मी कृतज्ञ आहे, असे रिषी खनाल याने सांगितले. तिने ढिगाऱ्याखालून काढली आपली मुलेझारीबार : नेपाळच्या भीषण भूकंपाच्या केद्रबिंदूजवळ असणाऱ्या खेड्यापाड्यांत भयंकर स्थिती असून, घर कोसळल्यानंतर ढिगाऱ्यात गाडल्या गेलेल्या आपल्या मुलांचे मृतदेह आईनेच ओढून काढल्याची घटना झारीबार खेड्यात घडली आहे. संथालिया असे या महिलेचे नाव असून, तिचा पती भारतात काम करतो. ती एकटीच मुलांसह गोरखा खोऱ्यापासून तासभराच्या अंतरावर असणाऱ्या खेड्यात राहत असे. १० वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखालून तिने ओढून काढले. एक चार वर्षांचा मुलगा मात्र वाचला असून तो एक चमत्कारच आहे. तिच्या घराशेजारची चारही घरे कोसळली आहेत. खेड्यात मरणाची शांतता आहे. मृतदेहांचा दुर्गंध पसरला आहे. सरकार व परदेशी मदत अजून या भागापर्यंत पोहोचली नाही. गोरखा खोरे व तेथील बर्फाळ शिखरे हे आधुनिक नेपाळ वसविणाऱ्या राजे पृथ्वी नारायण शाह यांचे घर. त्यांनी शाह राजवंशाची स्थापना केली व या घराण्याने नेपाळवर २४० वर्षे राज्य केले. २००८ साली नेपाळमध्ये राजेशाहीची सत्ता संपेपर्यंत याच घराण्याचे राज्य होते.आता भूस्खलनाचा धोकाभूकंपाने नेपाळमध्ये अपरिमित विनाश केला असताना, यातून सावरण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांपुढे नवे संकट उभे राहण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. येत्या काही आठवड्यांत दरडी कोसळणे व दलदल असणारी जमीन खचण्याचा धोका आहे, पावसाळा सुरू झाल्यानंतर तर या धोक्याची तीव्रता अधिकच वाढेल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ मरीन क्लार्क यांनी हिमालयाच्या लगत असलेल्या नेपाळमध्ये दरडी कोसळणे, तसेच दलदलीची जमीन खचण्याची शक्यता असणाऱ्या दहा हजार जागा दाखविल्या असून, यातील काही जागा नुकत्याच झालेल्या भीषण भूकंपानंतर आधीच खचल्या असण्याची शक्यता क्लार्क यांनी वर्तविली आहे. यासंदर्भात क्लार्क यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भूकंपामुळे खिळखिळे झालेल्या; पण अजूनही न खचलेल्या दरडी असण्याची शक्यता आहे. या जागा नाजूक झाल्या असून, नेपाळला बसणारे कमी-अधिक क्षमतेचे धक्के (आफ्टरशॉक्स) व पाऊस यामुळे ते कधीही खचण्याची भीती आहे, असे क्लार्क यांनी या निवेदनात म्हटले आहे. नेपाळ-तिबेट सीमेला जास्त धोका काठमांडूच्या उत्तरेकडचा भाग व नेपाळ-तिबेट सीमा या भागाला दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. या भागात अनेक लहान-लहान खेडी आहेत. परदेशी गिर्यारोहकातही या जागा लोकप्रिय आहेत. क्लार्क यांच्या पथकाने केलेले हे संशोधन नासा व इतर भूगर्भ अभ्यास संस्थांना दिले जात आहे. चीनमधील २००८ च्या सिचुआन भूकंपानंतर (७.९ मॅग्निट्यूड) दरडी कोसळणे व दलदलीची जमीन खचण्याचे २ लाख प्रकार घडले होते. या भूकंपात ७० हजार लोक मरण पावले होते व त्यातील काही या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे घडले होते.४घराच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून माझ्या मुलाची बोटे दिसत होती. तसेच मी त्याला वाचवले; पण दोन मुले मात्र गमावली, असे संथालिया सांगते. ४नेपाळमधील दुर्गम भागात कोठे किती नुकसान झाले आहे, कोणाला मदतीची गरज आहे याची माहिती सरकारकडे नाही. गोरखा खोरे अशाच दुर्गम भागात येते. २६ अब्ज रुपयांची गरजकाठमांडू : नेपाळमधील भूकंपाच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी ४१५ दशलक्ष डॉलर अर्थात सुमारे २६ अब्ज रुपयांची गरज आहे. भूकंपग्रस्तांना निवारा, पाणी, तातडीची आरोग्य सेवा व तीन महिन्यांसाठी सुरक्षित अन्न देण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करताना म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार या भीषण भूकंपात १० हजार लोक जखमी असून, ७० हजार घरे कोसळली आहेत. ५ लाख ३० हजार घरांचे नुकसान झाले आहे. भूकंपपीडितांना अन्न देण्यासाठी १ कोटी २८ लक्ष डॉलरची गरज असून, निवाऱ्याकरिता ५० दशलक्ष डॉलर हवे आहेत. सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ६३ दशलक्ष डॉलरची गरज आहे. आता नेपाळला येऊ नयेनेपाळने परदेशी शोध आणि मदत पथकांना देशात न येण्याचे आवाहन केले आहे. कारण देशात अगोदरच मोठ्या संख्येत कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्राचे नेपाळमधील मदत कार्य समन्वयक जैमी मॅकगोल्ड्रिक यांनी ही माहिती दिली.शोध आणि बचावकार्याची तात्काळ गरज भागविण्यासाठी पर्याप्त क्षमता असल्याचे नेपाळ सरकारला वाटते, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)काठमांडूच्या छोट्या एकमार्गी धावपट्टी असलेल्या विमानतळावर मदत आणि परदेशी विशेषज्ञांना घेऊन येणाऱ्या उड्डाणांची मोठी गर्दी झाली आहे. मदतीसाठी येणाऱ्या विमानांना उतरण्यासाठी धावपट्टीवर जागाच न राहिल्याने एक फ्रेंच विमान बुधवारी अबुधाबी येथे उतरवावे लागले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘भूकंप’ लिहिणाऱ्याची चौकशीदरभंगा/ पाटणा : भूकंपात जखमी झालेल्या लोकांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या माथ्यावर ‘भूकंप’ लिहिलेले स्टिकर चिकटवण्याचा संतापजनक प्रकार बिहारातील दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उघडकीस आला आहे. मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर बुधवारी बिहार सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.या रुग्णालयात भूकंपात जखमी झालेल्यांना वेगळ्या वॉर्डात ठेवण्यासोबतच त्यांच्या माथ्यावर भूकंप असे लिहिलेले स्टिकर चिकटवण्यात आले होते. मंगळवारी मीडियातून याचा गवगवा झाल्यानंतर आज बुधवारी हे स्टिकर काढून टाकण्यात आले.दरम्यान, दरभंगा जिल्ह्याचे पालकमंत्री बैद्यनाथ साहनी यांनी रुग्णालयास भेट देत, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यात कुणीही दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.४काठमांडू : संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार नेपाळच्या भूकंपाचा फटका ८० लाख लोकांना बसला आहे. त्यात ५० हजारांपेक्षा जास्त गर्भवती महिला असून त्यांची स्थिती खराब आहे. ४कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत गर्भवती महिलांना बसणारा फटका जबर असतो. अशा काळात नवजात अर्भके व प्रसूतीदरम्यानचे मृत्यू यांचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढते असे संयुक्त राष्ट्रातर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ४नेपाळमधील ७.९ मॅग्निट्यूडचा विनाशी भूकंप होऊन आता पाच दिवस उलटले असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आंतरराष्ट्रीय मदत आता पीडितांपर्यंत पोहोचत आहे.