सध्या वैवाहिक बलात्काराचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ५ चा भारतीय जोडप्यांच्या खासगी क्षणावर महत्त्वाचा रिपोर्ट समोर आला आहे. २०१९ ते २०२१ या काळात घेतलेल्या सर्व्हेतील एका प्रश्नात ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरुषांनी पत्नीनं पतीला सेक्ससाठी नकार देणे यात काही चुकीचं नाही असं म्हटलं आहे. सेक्सला नकार देण्यामागे ३ कारणंही सांगितली आहेत.
या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या प्रश्नात महिला, पुरुषांनी त्यांच्या खासगी क्षणांबाबत उत्तरं दिली आहेत. सेक्ससाठी नकार देण्यामागे ३ कारणं आहेत. त्यात पहिलं जर पुरुषाला कुठलाही लैंगिक आजार असेल, दुसरं पतीनं इतर महिलेसोबत संबंध ठेवले असतील आणि पत्नी थकलेली असेल तिचा मूड नसेल. सर्व्हेत ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरुषांना यापैकी कुठल्याही कारणामुळे पत्नी पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकत नाही. रिपोर्टमधून देशातील ८२ टक्के महिलांनी पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकतो असं म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी मागील आठवड्यात एनएफएचएस ५ रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, पाच पैकी ४ महिलांनी पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकते म्हटलं आहे. सेक्ससाठी नकार देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ९२ टक्के महिला गोवा तर अरुणाचल प्रदेश ६३ टक्के, जम्मू काश्मीरातील महिला ६५ टक्के सर्वात कमी आहेत. सर्व्हेत १८-४९ वयोगटातील केवळ ६ टक्के पुरुषांचं म्हणणं आहे की पत्नीनं सेक्ससाठी नकार दिला तर त्यांच्याकडे ४ पर्याय असू शकतात, ज्यात जबरदस्ती सेक्स करणं, रागावणे, ओरडणे किंवा अन्य महिलेसोबत सेक्स करणं. तर ७२ टक्के पुरुषांनी यापैकी कुठलाही पर्याय निवडला नाही.
केवळ ३२ टक्के विवाहित महिलांकडे नोकरी
सर्व्हेनुसार, विवाहित महिलांचा रोजगार दर मागील रिपोर्टच्या तुलनेत यंदा १ टक्क्याने वाढून ३२ टक्के इतका झाला आहे. या ३२ टक्के महिलांमध्ये १५ टक्के महिलांना वेतनही मिळत नाही. तर १४ टक्के महिला कमवलेला पैसा कुठे जातो हेदेखील विचारू शकत नाही. तर रिपोर्टनुसार, ९८ टक्के पुरुषांकडे नोकरी आहे. तसेच केवळ ५६ टक्के महिलांना एकट्याने बाजारात जाण्याची परवानगी आहे. ५२ टक्के महिला एकट्या हॉस्पिटलला जाऊ शकतात. ५० टक्के महिला गाव अथवा समाजाबाहेर एकट्याने जाऊ शकतात. एकूण भारतात केवळ ४२ टक्के महिलांना एकट्याने फिरण्याची मुभा आहे.