८२ वर्षाचा वर अन् वधू ३६ वर्षाची! निवृत्त अधिकाऱ्याने धरला निराधाराचा हात, अनोखा विवाह पाहण्यासाठी कोर्टात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:21 PM2022-03-05T20:21:56+5:302022-03-05T20:22:36+5:30
Marriage Ceremony : पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती.
उज्जैन : वृद्धापकाळात एकाकी जीवन जगणाऱ्या ८२ वर्षीय वृद्धाने शुक्रवारी एडीएम कोर्टात ३७ वर्षीय विधवा महिलेशी लग्न केले. हा वृद्ध १९९९ मध्ये पीडब्ल्यूडी विभागातून निवृत्त झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती. या दोघांनी भेटीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
वधू आणि वर कोण आहे?
एसपी जोशी असे या वराचे नाव असून, ते उज्जैनमधील वल्लभनगर येथील रहिवासी आहेत. ते पीडब्ल्यूडीमध्ये विभागप्रमुख होते. फेब्रुवारी १९९९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पत्नी आणि मुले नसल्याने एकटे राहत होते. त्याचवेळी वधू विभा जोशी या शास्त्रीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वय 36 वर्षे आहे. ती गृहिणी असून पतीच्या निधनानंतर आपल्या ६ वर्षाच्या मुलासह एकटीच राहत होती.
संमतीने विवाह
दोघांचे लग्न झाल्याची माहिती मिळताच हा अनोखा लग्नसोहळा पाहण्यासाठी आणि फोटो व्हिडिओ बनवण्यासाठी कोर्ट परिसरात तोबा गर्दी झाली होती. गर्दी आणि मीडिया पाहून दोघेही संतापले. वराने सांगितले की, आम्हाला करमणुकीचे साधन समजू नका, आम्ही परस्पर संमतीने अर्ज करून लग्न केले आहे. आमचे कोणी नाही, त्यामुळे आम्ही एकमेकांचा आधार बनण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
एकमेकांचा आधार बनण्याचा निर्णय
वऱ्हाडी बनलेले सेवानिवृत्त पीडब्ल्यूडी अधिकारी एसपी जोशी यांनी या जगात आपले कोणीच नसल्याचे सांगितले. त्यांना 28 हजार रुपये पेन्शन मिळते. विभाही विधवा झाल्यामुळे निराधार आहे. तिची अवस्था पाहून त्याने स्वतःच्या आनंदासाठी नाही तर तिच्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी विभा जोशी यांनी आधारासाठी लग्न करत असल्याचे सांगितले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यास आत्महत्या करू, असेही त्याने सांगितले.