ऑनलाइन लोकमतराजस्थान, दि. 20- कोणत्याही परीक्षेत नापास झाल्यास किंवा अपयश आल्यास माणसाच्या प्रयत्नांत खंड पडतो, असं नेहमीच पाहायला मिळतं. मात्र राजस्थानातल्या जयपूरमध्ये एका ८२ वर्षांच्या इसमाने तब्बल 47 वेळा 10वीची परीक्षा दिली आणि मात्र दुर्दैवाने ते पुन्हा नापासच झाले. राजस्थानपासून 140 किलोमीटरवरील बहरोड भागातल्या कोहारी गावात राहणारे शिवचरण हे शिवजीराम नावानंही परिचित आहेत. हे महाशय दहावीच्या परीक्षेत तब्बल 47 वेळा नापास झाले आहेत. विशेष म्हणजे जोपर्यंत 10वीच्या परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नसल्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे 82 वर्षीय शिवचरण यांच्यावर अद्याप अविवाहित असून यंदाही नापास झाल्याने त्या अजून वर्षभर तरी अविवाहीतच राहावे लागेल असे दिसते.स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहत शिवचरण यांनी अजून लग्न केलेलं नाही. शिवचरण यांनी आपली उमेद अजूनही सोडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीवर वाईट वाटून घ्यावं की त्यांच्या जिद्दीला सलाम करावा, याची आता सगळीकडे चर्चा आहे.
82 वर्षांचा इसम 10वीत तब्बल 47व्यांदा झाला नापास
By admin | Published: June 20, 2016 9:43 PM
राजस्थानमध्ये राहणारे ८२ वर्षी शिवचरण यांनी ४७ व्यांदा १०वीची परीक्षा दिली मात्र ते पुन्हा नापास झाले.
शिवचरण यादव हे वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात एकटेच राहतात. यंदा १० मार्चपासून राज्यात सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेत ते यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. १९६८ साली त्यांनी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली, मात्र त्यावर्षी ते नापास झाले. तेव्हापासून असंच सुरू आहे, ते एका वर्षी काही विषयांत उत्तीर्ण होतात, पण त्यांचे इतर काही विषय अडकतात. जर गणित आणि विज्ञानात चांगले गुण मिळाले तर ते हिंदी आणि इंग्रजीत नापास होत असत. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ साली ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदीच नजीक पोहोचले होते. त्यावर्षी ते जवळजवळ सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले, पण नेमका गणितात नापास झालो. पण तरीही त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. गेल्या ३० वर्षांपासून ते त्यांच्या पूर्वजांच्या घरात एकटेच रहात आहेत. सरकारतर्फे वृद्धांना देण्यात येणारे पेन्शन आणि शेजारील मंदिरातून मिळणार प्रसाद यावर त्यांनी आत्तापर्यंत गुजारण केली.