नवी दिल्ली : दुष्काळ किंवा महापुराचा फटका बसलेल्या कर्नाटक, पुडुचेरी आणि अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांसाठी ८४२.७ कोटी रुपयांच्या मदतीला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. पुडुचेरी आणि अरुणाचल प्रदेशाला पुराचा फटका बसला असून कर्नाटकमध्ये कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती आहे. केंद्रीय चमूने या राज्यांना भेटी देऊन सादर केलेल्या अहवालाच्या आधारावरील प्रस्तावावर समितीने हा निर्णय घेतला. कर्नाटकला ७२३.२३ कोटी तर पुडुचेरी आणि अरुणाचल प्रदेशाला अनुक्रमे ३५.१४ तसेच ८४.३३ कोटी रुपयांची मदत दिली जाईल.१० हजार कोटींपेक्षा जास्त मदतमहाराष्ट्रासह १० राज्यांचा दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये समावेश असून दुष्काळावर मात करण्यासाठी या राज्यांना १० हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दुष्काळग्रस्त तीन राज्यांसाठी ८४२ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 3:07 AM