इटानगर : शिक्षा म्हणून ८८ विद्यार्थिनींना शाळेत कपडे काढून उभे केल्याचा प्रकार अरुणाचल प्रदेशच्या पापुम पारे जिल्ह्यात घडला.आॅल सागली स्टुडंट्स युनियनने शाळेच्या तीन शिक्षकांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. गेल्या आठवड्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे मुख्य शिक्षक व एक विद्यार्थिनी यांच्याविषयी अश्लील मजकूर असलेली चिठ्ठी तीन शिक्षकांना सापडली होती. ती कोणी लिहिली, असा प्रश्न शिक्षकांनी केला. पण कोणीही चिठ्ठीची जबाबदारी घेतली नाही.त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी सहावी व सातवीतील ८८ विद्यार्थिनींना कपडे काढून उभे राहण्याची शिक्षा सुनावली.इटानगर महिला पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. पोलीस विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचीही चौकशी करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक तुम्मी अमो यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
८८ विद्यार्थिनींना कपडे काढून वर्गात केले उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:52 AM