अहमदनगर: जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ९६ टक्के मतदान झाले़ आठ नगरपालिकांच्या १६६ नगरसेवकांनीच मतदानाचा हक्क बजावला असून, मतमोजणीला बुधवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे़जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली़ मात्र मतदार जिल्ह्यातील असल्याने सकाळी मतदानाला थंडा प्रतिसाद होता़ दुपारनंतर मतदान केंद्र परिसरात नगरसेवकांनी हजेरी लावत मतदान केले़ जिल्ह्यातील प्रमुख पक्षांचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते़ दुपारनंतर मतदानाचा वेग वाढून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ नगरपालिकांच्या १७३ पैकी १६६ नगरसेवकांनी मतदान केले़ विविध नगरपालिकांचे आठ मतदार मतदान केंद्रांकडे फिरकलेच नाहीत़पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन समितीच्या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात आली़ महापालिकेच्या तीन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ मात्र नगरपालिकेच्या एका जागेसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ एका जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली़ जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला़ मतमोजणी बुधवारी सकाळी ८ वाजता प्रियदर्शनी सभागृहात होणार असून, दुपारनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे़
----असे झाले मतदानश्रीरामपूर नगरपालिका२९ पैकी २९संगमनेर२७- २४राहुरी२०-१९श्रीगोंदा१९-१९पाथर्डी१७-१७देवळाली प्रवरा१८-१६कोपरगाव२६-२६राहाता१७-१६