मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 09:38 AM2020-09-19T09:38:24+5:302020-09-19T10:05:12+5:30

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलमध्ये छापेमारी करत  अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations | मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

Next

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) मोठी कारवाई केली आहे. अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात NIA ला यश आलं आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली.  पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलमध्ये छापेमारी करत अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा, मोठा घातपात घडवण्याचा अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या कट होता. मात्र एनआयने कारवाई करत त्यांच्या हा कट  उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल-कायद्याशी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डिजिटल डिव्हाईस आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला काही दिवसांपूर्वी मोठं यश मिळालं होतं. बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तसेच दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. दहशतवाद्यांकडून सहा पिस्तुलं आणि 40 काडतुसं जप्त करण्यात आली. हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली होती. 

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव

बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्यांना चकमकीनंतर अटक करण्यात आल्याने हे मोठं यश मानलं गेलं. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने धक्कादायक माहिती दिली होती. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली होती. अबू युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव असून दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. अबू युसूफने राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा मोठा डाव असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

Read in English

Web Title: 9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.