शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

9 मुलांना कारनं चिरडणारा भाजपा नेता नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 9:09 PM

मुजफ्फरपूर येथे दारूच्या नशेत धुंद होऊन भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडणारा भाजपा नेता देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. भाजपा नेता मनोज बैठा हा अपघातानंतर भारत-नेपाळ सीमेजवळ कुठेतरी लपून बसला आहे.

बिहार- मुजफ्फरपूर येथे दारूच्या नशेत धुंद होऊन भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडणारा भाजपा नेता देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. भाजपा नेता मनोज बैठा हा अपघातानंतर भारत-नेपाळ सीमेजवळ कुठेतरी लपून बसला आहे. त्याला पकडण्यासाठी शहर पोलीस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तर आरोपी असलेल्या भाजपा नेत्याला 48 तासांच्या आत अटक करण्यात येईल, असंही मुजफ्फरपूरमधले वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो कारने 33 शाळकरी मुलांना चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर बिहारमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील झपहा येथे घडली होती. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेतून निघण्याची तयारी करत होते. यावेळी एक बोलेरो कार नियंत्रण सुटल्याने थेट शाळेच्या आवारात घुसली. अनपेक्षितपणे भरधाव वेगाने येणा-या बोलेरोखाली 33 विद्यार्थी आले. यामधील गंभीर जखमी झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांना एसकेएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असं म्हटलं आहे.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपा