केरळमध्ये बसचा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 38 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:23 AM2022-10-06T10:23:48+5:302022-10-06T10:40:37+5:30
केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्टची बस पर्यटक बसला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला असून 38 जखमी झाले आहेत.
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये पर्यटकांच्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्टची बस पर्यटक बसला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला असून 38 जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक बस एर्नाकुलम जिल्ह्यातील बसलियोस विद्यानिकेतनच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटी येथे जात होती. केरळचे राज्यमंत्री एमबी राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीची बसच्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आणि 38 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Kerala | 9 dead, 38 injured after a tourist bus crashed into KSRTC bus in Vadakkenchery in Palakkad district. The tourist bus was carrying students & teachers of Baselios Vidyanikethan in Ernakulam dist & was going to Ooty https://t.co/xIqHhROqffpic.twitter.com/XimJTDTPhA
— ANI (@ANI) October 6, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पर्यटक बसमध्ये विद्यार्थी होते. ही बस पुढे जात असलेल्या केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसला ओव्हरटेक करत होती. याच दरम्यान ती बसला धडकली. यानंतर दोन्ही बस पलटी झाल्या. या भीषण अपघातात दोन्ही बसमध्ये अडकून असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आणि बचावकार्यातील लोकांना खूप समस्यांचा सामना करावा लागला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"