राजस्थानच्या शहरांमध्ये 9 घरे! भाजपमध्ये गेलेल्या सीए वल्लभ यांची संपत्ती किती? पात्रांना 'झिरो' विचारलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:28 PM2024-04-04T15:28:21+5:302024-04-04T15:28:38+5:30
Gaurav Vallabh Property: अर्थशास्त्राचे जाणकार असलेल्या वल्लभ यांच्याकडे किती संपत्ती आहे, २०१९ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी झारखंडमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. २०२३ मध्ये राजस्थानमध्ये नशीब आजमावले होते.
देशाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणाऱ्या लोकांविरोधात सकाळ-संध्याकाळ शिवीगाळ करणे शक्य नाही, हिंदू असून सनातन विरोधात बोलत राहणे शक्य नाही असे सांगत भाजपात जाणाऱ्या काँग्रेसचे पेशाने सीए असलेल्या प्रवक्त्यांची संपत्ती समोर आली आहे. गौरव वल्लभ हे इकॉनॉमिक्सचे प्राध्यापकही होते.
अर्थशास्त्राचे जाणकार असलेल्या वल्लभ यांच्याकडे किती संपत्ती आहे, २०१९ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी झारखंडमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. २०२३ मध्ये राजस्थानमध्ये नशीब आजमावले होते. परंतु अपयशच आले होते.
या निवडणुकीत वल्लभ यांनी 11,56,59,986 रुपयांची एकूण संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. एक कोटीला सात शुन्य असतात. याच वल्लभ यांनी पात्रा यांना एक ट्रिलिअनला किती झिरो असतात असा थेट डिबेटमध्ये प्रश्न विचारत गप्प केले होते.
राजस्थानची निवडणूक नुकतीच पार पडली होती. यामुळे त्यांच्या संपत्तीत एवढा काही फरक पडला नसणार. यानुसार त्यांच्या बँक खात्यात 1,57,89,600 रुपये होते. Bonds, Debentures आणि कंपन्यांमध्ये त्यांचा १ कोटी एवढाच पैसा गुंतलेला आहे. सेव्हिंग स्कीममध्ये वल्लभ यांच्याकडे 72,28,111 रुपये आहेत. पती पत्नीकडे दोन कार आहेत. या दोन्ही कारची किंमत २४ लाख रुपये होती. तर वल्लभ यांच्याकडे ४०० ग्रॅम सोने, पत्नीकडे ४५० ग्रॅम सोने आहे. याची किंमत ४७.४० लाख रुपये होती.
वल्लभ यांच्याकडे स्थावर मालमत्ता खूप आहे. राजस्थानच्या जयपूर, जोधपूर आणि उदयपूरमध्ये त्यांच्याकडे ८ घरे आहेत. पत्नीच्या नावावरही गुडगावमध्ये एक घर आहे. या घरांची सरकारी किंमत 4,75,43,796 रुपये आहे.