नवी दिल्ली : झाकीर नाईक यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, त्यांच्या कारवायांचा तपास करण्यासाठी ९ पथके स्थापन केली आहेत. यात एनआयए, आयबी व इतर तपास यंत्रणांचा सहभाग आहे. ही विशेष पथके नाईक यांच्या प्रत्येक भाषणाचे फुटेज तपासत आहे.केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक यांच्या भाषणाचे व्हिडिओ फुटेज व सीडी तपासण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. तीन पथके सोशल साईटस् तर, दोन पथके फेसबुक पोस्टवर नजर ठेवून आहेत. प्राथमिक तपासानुसार, नाईक यांची भाषणे भडकावू आणि आक्षेपार्ह आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
९ पथकांतर्फे नाईक यांची चौकशी
By admin | Published: July 10, 2016 2:29 AM