शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

धक्कादायक! प्रशिक्षणाविनाच पायलट चालवत होते विमान, ९० वैमानिकांना विमान चालविण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 6:43 AM

वैमानिकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पाइस जेट विमान कंपनीच्या ९० वैमानिकांना बोइंग ३३७ मॅक्स विमान उडविण्यास मनाई केली आहे.

नवी दिल्ली :

वैमानिकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पाइस जेट विमान कंपनीच्या ९० वैमानिकांना बोइंग ३३७ मॅक्स विमान उडविण्यास मनाई केली आहे. डीजीसीएला वैमानिकांच्या प्रशिक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या वैमानिकांचे प्रशिक्षण नोएडा येथील एका केंद्रात झाले. डीजीसीएने चुकांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डीजीसीएच्या या निर्णयामुळे स्पाइस जेटच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. स्पाइस जेटकडे बोइंग ७३७ मॅक्स विमाने चालविण्यासाठी ६५० पायलट आहेत. यातील यापैकी ९० वैमानिकांवर बंदी घातल्यानंतर अजूनही ५६० वैमानिक त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. स्पाइस जेट सध्या ११ मॅक्स विमाने चालवते. ही ११ विमाने चालवण्यासाठी सुमारे १४४ वैमानिकांची गरज आहे. म्हणजेच त्यात सध्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त पायलट आहेत.

चीनमधील दुर्घटनेनंतर ठेवली पाळतचीनच्या पर्वतांमध्ये चिनी एअर लाइनचे बोइंग ७३७ विमान कोसळल्यानंतर डीजीसीएने बोइंग ७३७ फ्लाइट ऑपरेशन्सवर पाळत वाढवली आहे. यापूर्वी, इथियोपियन एअरलाइन्स ७३७ मॅक्स विमान आदिस अबाबाजवळ कोसळल्यानंतर डीजीसीएने खबरदारी म्हणून अपघातानंतर तीन दिवसांनी इंडियन एअर लाइन्सच्या मॅक्स विमानांवर बंदी घातली होती.त्यानंतरच विमान चालवा- डीजीसीएचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, सध्या वैमानिकांना विमान उडवण्यापासून थांबवले आहे. त्यांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. - या चुकांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. स्पाइस जेटने याप्रकरणी म्हटले की, डीजीसीएने ९० वैमानिकांच्या प्रशिक्षणाचे निरीक्षण करीत त्यांना विमान उड्डाण करण्यापासून रोखले आहे. - पुन्हा प्रशिक्षण दिल्यानंतर वैमानिक विमान उडवू शकतील.

टॅग्स :spicejetस्पाइस जेट