शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 9:06 AM

नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई सुरू केली आहे.

हरियाणातील हिंसाचाराच्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी तीव्र कारवाई केली आहे. आतापर्यंत ५ जिल्ह्यांमध्ये ९३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. १७६ जणांना अटक करण्यात आली आहे. एकट्या नूहमध्ये ४६ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय नूहचे पोलीस अधिकारी वरुण सिंगला यांचीही बदली करण्यात आली आहे. सोशल मीडियावर फिरणारे २३०० व्हिडिओ पोलिसांनी ओळखले आहेत. हिंसाचाराला चिथावणी देण्यात या व्हिडिओंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांचे मत आहे.

नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ एफआयआर नोंदवले आहेत. सोशल मीडियावरील पोस्टबाबत पोलिसांनी कलम-१५३, १५३A,२९५A,२९८, ५०४, १०९ आणि २९२ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मात्र, शायर गुरू घंटल नावाचे अकाऊंट कोण चालवत होते, याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही. पोलीस अशा सुमारे २३०० व्हिडिओंचा तपास करत आहेत, जे हिंसाचार पसरवण्यास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

हरियाणा सरकारच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव TVSN प्रसाद यांनी जनतेला आश्वासन दिले की बाधित भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. या भागात तुरळक घडामोडींवर कारवाई केली जात आहे. ते म्हणाले की, सरकार पुरेशा सैन्यासह पूर्णपणे तयार आहे. राज्यभरात निमलष्करी दलाच्या २४ कंपन्या तैनात आहेत. नूहमध्ये कर्फ्यू सुरू आहे. याशिवाय इंटरनेटही बंद आहे. नूह व्यतिरिक्त फरिदाबाद, पलवल, सोहना, पटौडी आणि गुरुग्रामच्या मानेसरमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नूह, सोहना आणि गुरुग्राममधील मुस्लिम समुदायाने घरी नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱ्याने वाचवले ३५ जणांचे प्राण

मुबारिकपूर गावात राहणारा आबिद हुसेन अधिकारी आहेत. ते नूह बसस्थानकाजवळ फौजदार ओंबीर यांच्यासोबत उभे होते. तेव्हाच त्यांना माहिती मिळाली की, काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सहभागी काही लोकांना ओलीस करून एका धार्मिकस्थळी कोंडून ठेवले आहे. माहिती मिळताच ते ओंबीर आणि इतर पोलिसांसह पोहोचले. ते पोहोचताच हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार सुरू केला. ओलिसांना वाचवण्यासाठी आबिद हुसेन धावले. काही मिनिटांचाही उशीर झाला असता तर किमान ३५ जणांचा जीव धोक्यात होता.

नूह येथे मिरवणुकीत हिंसाचार पसरला

३१ जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. पोलिसांवरही हल्लेखोरांनी हल्ला केला. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नूहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. नूह हिंसाचारात दोन होमगार्डसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliceपोलिस