आपल्या देशात बरेच मोठे घोटाळे झाले. पण, सर्वात जास्त चर्चेत असलेला घाटाळा म्हणजे तेलगीने केलेला स्टॅम्प घोटाळा. २००३ मधील स्टॅम्प घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'Scam 2003' नावाची एक वेब सिरीज आली आहे. ही वेब सिरीज तेलगीने केलेल्या घोटाळ्यावर असून यात तेलगीच्या लहानापासून ते तेलगी पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला ही स्टोरी आहे, ये वेब सिरीजमध्ये तेलगीने एका बार डान्सरवर एका रात्रीत ९३ लाख रुपये उधळल्याचे दाखवले आहे. ती बार डान्स म्हणजे 'तरन्नूम'. ९० च्या दशकात तरन्नूम फेमस बार डान्सर होती.
जबरदस्त! समुद्रात चीनचे वर्चस्व संपणार, भारतीय नौदलाला मिळणार 'या' २७ पाणबुड्या
तेलगी मुंबईत आल्यानंतर त्याचा एक मित्र तेलगीला डान्स बारमध्ये जाण्याची सवय लावतो. यावेळी तेलगीला एक बार डान्सर 'तरन्नूम' आवडते. तो तरन्नूमला पाहण्यासाठी नेहमी त्या बारमध्ये जात होता. एका रात्री तो 'तरन्नूमवर' ९३ लाख रुपये उधळतो. ही माहिती दुसऱ्या दिवशी मुंबईत पसरते. यामुळेच तेलगी अडचणीत सापडतो, आणि तेलगीचा स्टॅम्प घोटाळा समोर आल्याचे, या वेब सिरीजमध्ये दाखवले आहे.
'तरन्नूम' कोण होती?
मुंबईतील अंधेरी भागात राहणारे तरन्नुमचे वडील एक छोटेसे दुकान चालवायचे. तरन्नुमच्या कुटुंबात तिचा भाऊ आणि बहिणीसह एकूण ६ जण होते. या दुकानातून मिळणाऱ्या कमाईवर ६ लोकांचे हे कुटुंब जेमतेम उदरनिर्वाह करू शकत होते. १९९२ च्या जातीय दंगलीत तरन्नुमचे घर आणि दुकान लुटण्यात आले होते. संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. मदत छावणीत राहण्याची परिस्थिती आली. यानंतर तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरची आर्थिक परिस्थिती पाहून तरन्नुमला डान्सबारमध्ये काम करावे लागले.
मुंबईत एक वेळ अशी होती. रात्रभर हे बार गजबजलेले असायचे आणि त्यात काम करणाऱ्या बार गर्ल्सवर चलनी नोटांचा वर्षाव केला जायचा. त्या काळात 'तरन्नुम खान' या बार डान्सर खूप प्रसिद्ध होती. तरन्नुमला देशातील सर्वात श्रीमंत बार डान्सर देखील म्हटले जात होते. तिच्यावर तेलगीने एका रात्री ९३ लाख रुपये उधळल्याने प्रसिद्ध झाली.
तिची एक झलक पाहण्यासाठी अनेक दिग्गज लोक बारमध्ये येत होते. तिची अदा पाहून तिला दुबईलाही बोलावलं जात होतं. तिने मुंबईतील वर्साव्यात तिने एक बंगलाही, कार घेतला होता. २००५ च्या अखेरीस आयकर विभागाने तरन्नूमच्या बंगल्यावर धाड टाकली. यावेळी तिच्यावर मोठी रक्कम मिळाली नाही. तिची पुढं चौकशी झाली, यात ती फोन कॉलच्या चौकशीत सापडली. तेव्हा तिच्या संपर्कात अनेक दिग्गज लोक असल्याचे समोर आलं. याच दरम्यान तेलगीची चौकशी सुरू होती, तेव्हा तेलगीने तिच नाव घेत ९३ लाख रुपये तिच्यावर उधळल्याचे कबुल केलं. तेव्हा ही केस आयकर विभागाकडून मुंबई पोलिसांकडे गेली. सप्टेंबर २००५ ला तरन्नूमला अटक झाली, २००८ ला तिने आयकर विभागाने विभागाकडे आपली संपत्ती परत मिळावी म्हणून अर्ज केला होता. यानंतर ती कधी पुढं आलेली नाही.