नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ नियंत्रणात येत असून बरे होणाऱ्यांची संख्या ९५ लाख तर त्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. गेल्या सलग दहा दिवसांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांहून कमी असून त्यांचे प्रमाण ३.३४ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोरोनाचे २६,३८२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९९.३२ लाख झाली. बरे झालेल्यांची संख्या ९४,५६,४४९ तर प्रमाण ९५.२१ टक्के आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९९,३२,५४७ आहे. या संसर्गाने आणखी ३८७ जण मरण पावले असूून बळींची संख्या १,४४,०९६ झाली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३,३२,००२ तर मृत्युदर अवघा १.४५ टक्के आहे. अमेरिकेत ६८ लाख सक्रिय रुग्ण असून ३ लाख ११ हजार जणांचा बळी गेला आहे. जगभरात ७ कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ५ कोटी १८ लाख लोक बरे झाले आहेत. अमेरिकेत २ लाख नवे रुग्णअमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २ लाख ४८ हजार नवे रुग्ण आढळून आले. ही या प्रकारची त्या देशातील सर्वाधिक संख्या आहे. याच कालावधीत अमेरिकेत कोरोनाने २,७०६ जण, तर भारतामध्ये ४०० हून कमी लोक मरण पावले. बारापैकी एका ओळखपत्राद्वारे होणार लस घेणाऱ्याची नावनोंदणी- एस. के. गुप्तानवी दिल्ली : लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीने मतदारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहनचालक परवाना आदी १२ ओळखपत्रांपैकी एखादे ओळखपत्र सादर करायचे आहे. या ओळखपत्राच्या आधारे ‘को-विन अॅप’वर नावाची नोंदणी होईल.कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (को-विन) या अॅपच्या मदतीने या लसीचा साठा व वितरणाबाबतची ताजी माहिती केंद्र सरकारला मिळणार आहे. तसेच कोणाला लस टोचली व अजून किती व्यक्ती बाकी आहेत? याचाही तपशील या अॅपद्वारे समजू शकणार आहे. महिलांना लस टोचताना त्या केंद्रावर महिला कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. लसीच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारने काही नियम आखून दिले आहेत. थेट सूर्यप्रकाशाशी या लसींचा संबंध येणार नाही अशा रीतीने त्यांची साठवणूक करण्यास सांगितले.
CoronaVirus News: कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 95 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 3:07 AM