श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादी नेटवर्कचा संपूर्ण खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून काश्मीरच्या विविध भागात लपलेल्या दहशतवाद्यांची यादी तयार केली जात आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधील 9 भागात सक्रिय असलेल्या एकूण 97 दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. रिपोर्टनुसार, या 97 दहशतवाद्यांपैकी 24 हिजबुल मुजाहिद्दीन, 52 लष्कर, 11 अल बद्र आणि 9 दहशतवादीजैश-ए-मोहम्मद संघटनेचे आहेत.
पुलवामामध्ये सर्वाधिक दहशतवादी आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील 9 भागांपैकी सर्वाधिक दहशतवादी पुलवामामध्ये आहेत. पुलवामामध्ये एकूण 36 दहशतवादी असून त्यापैकी 10 हिजबुल मुजाहिद्दीन, 17 लष्कर, 4 अलबदार, 4 जैश दहशतवादी आहेत. त्यानंतर शोपियानचा क्रमांक लागतो, जिथे एकूण 24 सक्रिय दहशतवाद्यांची माहिती आहे, त्यापैकी हिजबुल मुजाहिद्दीनचे 5, लष्करचे 14 आणि अलबदारचे एकूण 5 दहशतवादी लपल्याची माहिती आहे. तसेच कुलगाममध्ये 13, श्रीनगरमध्ये 8, अनंतनागमध्ये 8 आणि बारामुल्लामध्ये 5 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणा सर्व दहशतवाद्यांविरोधात कारवाईची तयारी करत आहेत.
या वर्षात 46 वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले
पाकिस्तानची आयएसआय सातत्याने तरुणांना दहशतीच्या मार्गावर ढकलण्याबरोबरच नियंत्रण रेषेवरुन दहशतवाद्यांना खोऱ्यात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. एका अहवालानुसार, या वर्षात आतापर्यंत 46 घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले असून, यामध्ये सुमारे 17 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत किती दहशतवाद्यांनी घुसखोरी केली, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही.
सुरक्षा यंत्रणाची प्लानिंग सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचा विषय असो की सुरक्षा दलांवर हल्ले करणे असो. त्याच्या नियोजनापासून ते काश्मिरी तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यापर्यंत सीमेपलीकडून कट रचला जातो. घुसखोरी करुन खोऱ्यात अनेक दिवसांपासून लपून बसलेले पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये सातत्याने दहशतीचा कट रचत आहेत. अशा परिस्थितीत खोऱ्यात लपून बसलेल्या सर्व पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आता कंबर कसली आहे.
काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी आहेत
गुप्तचर यंत्रणांनी खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी आहेत, जे काश्मीरच्या शांततेसाठी मोठा धोका आहे. ज्या 38 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे, त्यापैकी 27 दहशतवादी लष्करचे आहेत आणि उर्वरित 11 दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे आहेत. यादीनुसार, यातील 4 दहशतवादी श्रीनगर, 3 कुलगाम, 10 पुलवामा, 10 बारामुल्ला आणि 11 दहशतवादी वेगवेगळ्या भागात लपलेले असू शकतात.
आयएसआय भारताविरुद्ध मोठा कट रचतोय
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या दहशतवादी तळामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादी तळांमध्ये 200-300 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानकडून युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा दहशतवादी तळांमध्ये दहशतवादी जमल्याची माहिती मिळाल्यानंतर आयएसआयने भारताविरोधात मोठा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.