शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

देशातील ९९ टक्के नेते दांभिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:09 PM

देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे नेत्यांवर टीका केली. 

ठळक मुद्दे रामदेवबाबा यांची टीका : संधी मिळेल तेव्हा या नेत्यांचा पर्दाफाश करू  

रोहटक : देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे नेत्यांवर टीका केली. येथे गुरुकुल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस नाही. देशातील ९९ टक्के राजकीय नेते दांभिक आहेत; पण मला संधी मिळेल तेव्हा या भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यात मला काहीच अडचण असणार नाही. स्वयंघोषित बाबा, देवाचा अवतार आणि हातावरून भविष्य सांगणारांपासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. जर असे बाबा तुमचे भविष्य सांगण्याचा दावा करीत असतील तर त्यांचे बूट लपवून ठेवा आणि ते कुठे आहेत हे त्यांना विचारा, असा चिमटाही त्यांनी काढला. ज्यांना स्वत:चे भविष्य माहीत नाही ते तुमचे भविष्य सांगून पैसे कमावतात, असेही ते म्हणाले.       जर लोकांकडे वैज्ञानिक वैचारिकता नसेल तर, रामरहीमसारखे बाबा लोकांना मुर्खात काढत राहतील. रामरहीम आणि आसाराम बापू यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, जर लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा असे वाटत असेल तर, एका संताने संतासारखे राहावे, असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळात काही बाबांवर अनेक आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी अशा बाबांचा आज समाचार घेतला. हरियाणा सरकारने रामदेवबाबा यांना आयुर्वेद आणि योग यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविले आहे.