नवी दिल्ली - दिल्लीतील सरकारी शाळांचा नववी आणि अकरावीचा निकाल जाहीर झाला आहे. 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. edudel.nic. in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. तसेच शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाठवला आहे. याबाबत दिल्ली सरकारने गाइडलाइन्स जारी केले होते. यामध्ये कोणताही शाळा विद्यार्थ्यांना निकालासाठी शाळेत बोलवू शकत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाठवण्यात यावा असं म्हटलं होतं.
अकरावीमध्ये 1.70 लाख विद्यार्थी होते. मात्र त्यातील 1.69 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील आता 1.65 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल 96.9 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता नववीमध्ये जवळपास 12500 आणि अकरावीत 3500 विद्यार्थ्यांनी एकही परीक्षा दिलेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही ते अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांना प्रोजेक्ट बेस्ड रिएसेसमेंट केलं जाणार आहे. जे क्लास बेस्ड असाईंनमेंट या प्रोजेक्टवर आधारीत असणार आहे. या संबंधीची अधिक माहिती ही अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.