नवी दिल्ली : प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याने प्रेयसीसोबत चॅटिंग केली होती. याशिवाय त्याने सकाळी 4 वाजता त्याच्या दाजीला देखील मेसेज केला होता. त्यानंतर घरातून बाहेर पडून त्याने स्वत:वर गोळी झाडली. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर मोबाईल चॅटच्या माध्यमातून वास्तव समोर आले, त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून आत्महत्येप्रकरणी खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
12वीतील तरूणाने संपवलं जीवनखरं तर ही घटना अमरोरा पोलीस स्टेशन परिसरातील दादुपूर गावातील आहे. इथे शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि दोन मुले आहेत. तर दोन मुली विवाहित आहेत. लहान मुलगा जवळच्या गावातल्या शाळेत बारावीत शिकत होता. शुक्रवारी रात्री ते नातेवाईकांकडे जेवण करून झोपायला गेले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांच्या मुलाचा मृतदेह गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या जंगलात पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात प्रथमत: खळबळ उडाली.
एसपी आदित्य लंघे, एएसपी राजीव कुमार सिंग, सीओ अरुण कुमार आणि एसएचओ रमेश सेहरावतही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा करून श्वान पथकाला घटनास्थळी आणले. नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी मुलाचे कोणाशीही वैर नसल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी यापूर्वी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पण मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲपवरील चॅटिंगमुळे घटनेवरील पडदा हटला. प्रेमप्रकरणामुळे किशोरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले.
प्रेयसी रात्री फोन उचलत नव्हती चॅटिंगमध्ये तो रात्री अडीच वाजेपर्यंत प्रेयसीशी बोलत होता. रात्री प्रेयसी फोन उचलत नसल्यामुळे किशोरने तिला आत्महत्या करण्याचा मेसेज केला होता. तर पहाटे चार वाजता त्याने त्याच्या दाजीला देखील मेसेज करून मला माफ करा असे म्हटले होते. हे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी खुनाचा एफआयआर आत्महत्येत बदलला. एसओ रमेश सेहरावत यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून गोळी झाडून आत्महत्या केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"