शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
3
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
4
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
5
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
6
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
7
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
8
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
9
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
10
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
11
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
12
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
13
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
14
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
15
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
16
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
17
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
18
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
20
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?

धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 3:05 PM

झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.

नवी दिल्ली : झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने विष प्राशन केले तर प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली. हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे काही ग्रामस्थ आणि पंचायत प्रमुखांचे म्हणणे आहे. कारण दोन्हीकडील कुटुंबियांना हे नाते मंजूर नव्हते. त्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. जंगलाच्या शेजारी वसलेल्या गावातील 15 वर्षीय तरुणीने आपल्या 17 वर्षीय प्रियकरासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला होता. या प्रकारामुळे कुटुंबीय संतापले होते. मृत प्रेमी युगुलाचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. मुलीच्या नातेवाईकांनी या नात्यावर नाराजी व्यक्त करत मुलाला भेटू देण्यास नकार दिला. मात्र, शनिवारी रात्री घरच्यांनी कडक पवित्रा दाखवल्याने मुलीने घरापासून दूर जाऊन विष पिऊन जीवन संपवले. याबाबतची माहिची प्रियकराला मिळताच त्याच रात्री त्याने घराजवळील झाडावर साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रियकराचे आधीच लग्न ठरले होते पण...दोघांमध्ये मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मृत मुलगा हा परहिया जमातीचा होता तर मुलगी मुंडा समाजातील होती. लक्षणीय बाब म्हणजे मुलाचे एक वर्षापूर्वी दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते, ज्याची पत्रिका देखील छापली होती. मुलाच्या घरच्यांनी काही ठिकाणी पत्रिकांचे वाटप देखील केले होते. असे असतानाही ते दोघे पळून गेले होते. बऱ्याच दिवसांच्या शोधानंतर मे 2022 मध्ये दोघांना पकडून गावात आणण्यात आले. दोघांनाही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करायचे होते. पण दोघांचेही कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliceपोलिसDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट