मुस्लीम बांधवांसाठीची पवित्र महिना असलेल्या रमजानच्या महिन्याला सुरुवात झालीय. त्यानुसार, या महिन्यात रोजा पकडण्यात येतो. सकाळी दिवस उजाडण्यापूर्वी आणि सध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा धरला व सोडला जातो. म्हणजेच, सेहरी आणि इफ्तारची वेळ मुस्लीम बांधवांना कळवलो जाते. त्यानुसार, ते रोजा उपवासाची सुरुवात व सांगता करतात. जवळपास महिनाभर रोजा पकडण्याची परंपरा मुस्लीम बांधवांमध्ये आहे. काळानुसार तंत्रज्ञान विकसित झाल्याने सेहरी आणि इफ्तारची वेळ ही वेगवेगळ्या माध्यमांतून सांगण्यात येते. मात्र, मध्य प्रदेशातील राससेन किल्ल्यावरुन दोनवेळा तोफ चालवूनच रोजाची माहिती दिली जाते.
मध्य प्रदेशचा रायसन जिल्ह्यात आजही जुनीच ३०० वर्षांची परंपरा पाळून रमजानच्या रोजाची माहिती दिली जाते. विशेष म्हणजे हिंदू कुटुंबातील सदस्यही ढोल वाजवून या रोजा धरणाऱ्या मुस्लीम बांधवाना झोपेतून जागे करतात. भोपाळपासून जवळपास ४७ किमी अंतरावर असलेल्या रायसन जिल्ह्यात आजही ही परंपरा जोपसत किल्ल्यावरुन रोजाच्या वेळेची माहिती दिली. तोफेच्या आवाजाने एखाद्या नवख्या व्यक्तीला भूकंप झाला की काय, किंवा गुढ आवाज आला की काय, असेच वाटेल.
रोजाची माहिती देण्यासाठी रायसन किल्ल्याच्या टेकडीवरुन पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळेत तोफ डागली जाते. या तोफेच्या आवाजाने परिसरातील ३५ गावांतील मुस्लीम बांधवांना रोजा पकडण्याची आणि सोडण्याची वेळ समजते. ३०० वर्षांपूर्वी राजा-नवाबांचे शासन होते, तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे. कारण, त्यावेळी, रोजाची माहिती देण्यासाठी इतर साधनसामुग्री नव्हती. त्यामुळे, किल्ल्यावरुन तोफेचा आवाज करत गावाला राजाच्या सहेरी आणि इफ्तारची माहिती दिली जात, ती परंपरा आजही येथे पाहायला मिळते.